मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jeev Maza Guntala: 'जीव माझा गुंतला'मधील योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले अडकले विवाहबंधनात

Jeev Maza Guntala: 'जीव माझा गुंतला'मधील योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले अडकले विवाहबंधनात

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 03, 2024 05:56 PM IST

Yoigta Chavan Saorabh Choughule Wedding: अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे नुकताच विवाहबंधनात अडकले असून सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Yoigta Chavan Saorabh Choughule Wedding
Yoigta Chavan Saorabh Choughule Wedding

Malhar and Antara wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'जीव माझा गुंतला.' या मालिकेत अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चोघुले महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या ऑनस्क्रिन जोडीने खऱ्याखुऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

योगिताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तिने सौरभशी लग्न केल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. योगिता आणि सौरभचा विवाहसोहळा ३ मार्च रोजी पार पडला. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा लग्नसोहळा पार पडलाय. योगिताने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा: चॅनेलचा दबाव झुगारून...; ‘मुलगी झाली हो’चा उल्लेख करत किरण मानेची पोस्ट

योगिताने शेअर केले फोटो

योगिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर करत 'हमसफर' असे कॅप्शन दिले आहे. लग्नात तिने लालसर रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे. त्यावर हिरव्या रंगाची शाल घेतली आहे. कपाळी मुंडावळ्या, गळ्यात मंगळसूत्र या लूकमध्ये योगिता अतिशय सुंदर दिसत आहे. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यावर हिरव्या रंगाची शाल घेतली आहे. वर आणि वधूच्या लूकमध्ये दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.
वाचा: मुलाच्या प्रीवेडिंगमध्ये मुकेश आणि नीता अंबानी झाले रोमँटिक

योगिता आणि सौरभने जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा आणि मल्हारचे पात्र साकारले होते. या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आता ही ऑनस्क्रीन जो़डी विवाहबंधनात अडकल्याचे कळताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. आता योगिता आणि सौरभ हनीमूनला कुठे जाणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

WhatsApp channel

विभाग