सुरुवातीला 'या' सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली होती पाठ, अभिनेत्याने लढवली शक्कल आणि ठरल ब्लॉकबस्टर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुरुवातीला 'या' सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली होती पाठ, अभिनेत्याने लढवली शक्कल आणि ठरल ब्लॉकबस्टर

सुरुवातीला 'या' सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली होती पाठ, अभिनेत्याने लढवली शक्कल आणि ठरल ब्लॉकबस्टर

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 21, 2024 03:33 PM IST

५७ वर्षांपूर्वी एक बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला सुपरफ्लॉप ठरला होता. या सिनेमातील अभिनेत्याने अशी काही शक्कल लढवली की सिनेमा नंतर ब्लॉकबस्टर ठरला.

Jeetendra movie
Jeetendra movie

सिनेमा म्हटले की कधी हिट ठरतात तर कधी प्लॉप ठरतात. पण कधीकधी चित्रपट चालवण्यासाठी कलाकार आणि निर्माते एक वेगळी शक्कल देखील लढवावी लागते. बॉलिवूडचे असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांच्या मागे असे अनेक गमतीशीर किस्से आहेत. ५७ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. पण नंतर अभिनेत्याने असे काही केले की सिनेमा जवळपास १२ आठवडे हा सिनेम चित्रपटगृहामध्ये तग धरुन होता. त्यावेळी हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये गणला गेला होता. चला जाणून घेऊया कोणता होता हा सिनेमा?

काय आहे सिनेमाचे नाव?

आम्ही अशा चित्रपटाबद्दल बोलत आहोत जो १९६७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 'फर्ज' आहे. या चित्रपटात जितेंद्र, बबिता कपूर आणि अरुणा इराणी मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट जितेंद्रच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या यशामुळे ते रातोरात सुपरस्टार ठरले होते.

५७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'फर्ज' चित्रपट अनेक आठवडे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, हे तुम्हाला माहित आहे का? सुमारे १२ आठवडे चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा होता. सुरुवातीला प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली होती. तसेच बॉक्स ऑफिसवर कमाई देखील करु शकला नव्हता. 'फर्ज' हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप होण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे चित्रपटातील अभिनेते जितेंद्र यांनी शक्कल लढवली आणि सिनेमा फ्लॉप होण्यापासून वाजला. सिनेमा नंतर ब्लॉकबस्टर ठरला.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?

अभिनेत्याने काय केले?

आयएमडीबीच्या रिपोर्टनुसार, 'फर्ज' चित्रपटाला प्रेक्षक न मिळाल्याने जितेंद्रने स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून बाराव्या आठवड्यात चित्रपटाची सर्व तिकिटे खरेदी केली. चित्रपटगृहांच्या मालकांनी हा चित्रपट काढून टाकू नये म्हणून अभिनेत्याने हे केले. १५ व्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट सुरू राहिला तर त्याचे कलेक्शन वाढेल, असे जितेंद्रला वाटले. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे घडलं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. जितेंद्रचा 'फर्ज' हा १९६७ मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. याला आयएमडीबीवर ६.२ रेटिंग आहे.

Whats_app_banner