मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  BhauBali: विनोदाचा अनलिमिटेड कल्ला! जयंत पवार लिखित 'भाऊबळी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

BhauBali: विनोदाचा अनलिमिटेड कल्ला! जयंत पवार लिखित 'भाऊबळी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 24, 2022 05:17 PM IST

Jayant Pawar: 'भाऊबळी' हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मनोज जोशी, हृषीकेश जोशी, संतोष पवार, किशोर कदम, मेधा मांजरेकर, रेशम टिपणीस, आशय कुलकर्णी हे कलाकार दिसणार आहेत.

भाऊबळी
भाऊबळी (HT)

सध्या ट्विटर सुरु असणाऱ्या बॉयकॉट ट्रेंडमुळे बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीत. बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्ग हा मराठी चित्रपटांकडे वळला आहे. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता समीर पाटील दिग्दर्शित एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विनोदाचा तडका असणाऱ्या या नव्या चित्रपटाचे नाव 'भाऊबळी' असे आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हे पोस्टर शेअर करत 'विनोदाचा तडका लावायला आणि अनलिमिटेड कल्ला करायला येतोय भाऊबळी. १६ सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात' असे कॅप्शन देण्यात आले आहे. या चित्रपटाचे पोस्टर पाहाता चित्रपटात मनोज जोशी, हृषीकेश जोशी, संतोष पवार, किशोर कदम, मेधा मांजरेकर, रेशम टिपणीस, आशय कुलकर्णी हे कलाकार दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'भाऊबळी' या चित्रपटाचे लेखन जयंत पवार यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील करत असून हा चित्रपट १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. दिग्दर्शक समीर पाटील यांनी याआधी शेंटिमेंटल, पोश्टर बॉय, पोश्टर गर्ल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

IPL_Entry_Point

विभाग