जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांचे भोपाळमध्ये निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बच्चन कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी या अफवांचे खंडन करत आपली आई जिवंत असल्याचे म्हटले आहे. अभिषेक बच्चनच्या टीमच्या अधिकृत नोटमध्ये इंदिरा भादुरी ठीक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
'जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांचे निधन झाल्याचा दावा अनेक प्रसारमाध्यमांनी केला असून, या दु:खद बातमीनंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन भोपाळला पोहोचला आहे. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे,' असे बच्चन कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या जया बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आम्ही चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी समर्थन करावे आणि अशा अफवा पसरवणे टाळावे ही विनंती करतो.'
सूत्रांनी सांगितले की, अशा खोट्या बातम्यांमुळे कुटुंबांवर परिणाम होतो. त्यांना खोट्या अहवालांच्या अतिरिक्त ओझ्याला सामोरे जावे लागू नये. यावेळी बच्चन कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि भविष्यातील अपडेटसाठी विश्वसनीय स्त्रोतांकडून माहिती घ्यावी, असे आवाहन सूत्रांनी केले आहे.
जया बच्चन यांच्या आईचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अखेरचा श्वास घेताना त्या भोपाळमध्ये होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि वैद्यकीय देखरेखीखाली होत्या, असा दावाही करण्यात आला होता. काल रात्री इंदिरा यांची तब्येत बिघडली आणि त्यांना भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जया भोपाळमध्येही पोहोचल्या आहेत. तर अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्य लवकरच रुग्णालयात दाखल होतील असे बोलले जात होते. पण या सगळ्या अफवा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य
जया बच्चन यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्या लहान वयातच सिनेक्षेत्रात आल्या होत्या. वयाच्या अवघ्या १५व्या व्या वर्षी सत्यजित रे यांच्या महानगर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. उपहार, त्रयश, कोरा कागज, जंजीर, अभिमान, चुपके चुपके या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. त्यांनी शेवटचे रॉकी और रानी की प्रेम कहाणी सिनेमात त्या दिसल्या होत्या
संबंधित बातम्या