मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira Khan Reception: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चनने सोनाली बेंद्रेकडे केले दुर्लक्ष Video viral

Ira Khan Reception: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चनने सोनाली बेंद्रेकडे केले दुर्लक्ष Video viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 14, 2024 10:27 AM IST

Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception : सध्या सगळीकडे आमिर खानची लेक आयराच्या लग्नाच्या रिसेप्शनची चर्चा सुरु आहे. या रिसेप्शनमधील एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Jaya Bachchan
Jaya Bachchan

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक नुकताच लग्नबंधनात अडकली आहे. शनिवारी मुंबईत तिच्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आले. १० जानेवारीला उदयपुरमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आयरा विवाह बंधनात अडकली. आता १३ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या रिसेप्शनला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. सध्या सोशल मीडियावर रिसेप्शनमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी जया बच्चन यांना चांगलेच सुनावले आहे.

आमिर खानने मुलीच्या रिसेप्शनला बच्चन कुटुंबीयांना देखील बोलावले होते. यावेळी जया बच्चन हा मुलगी श्वेता नंदासोबत पार्टीला उपस्थित राहिल्या. निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन जया बच्चन अतिशय सुंदर दिसत होत्या. नेहमीप्रमाणे त्या कॅमेरासमोर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत.
वाचा: सई आणि सिद्धार्थचा किसिंग सीन, श्रीदेवी प्रसन्नचा ट्रेलर पाहिलात का?

जेव्हा जया बच्चन मुलगी श्वेता सोबत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देत होत्या तेव्हा सोनाली बेंद्रे तेथे आली. जया बच्चन इकडे-तिकडे न पाहाताच तेथून निघून जातात. त्यानंतर श्वेता त्यांना सांगते की, मम्मी ती आताच तर आली आहे. तेव्हा जया बच्चन यांना आपण काही तरी गडबड केल्याची भावना मनात येते. त्या पुन्हा मागे येतात आणि त्या दोघींसोबत फोटो काढतात. या सगळ्याच जया बच्चन एकदाही सोनालीकडे पाहात नाहीत.

सोशल मीडियावर जया बच्चन यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. जया बच्चन यांना झालेय तरी काय, त्या अशा का वागतात असे एका यूजरने म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने या सतत अशाच वागत असतात अशी कमेंट केली आहे.

WhatsApp channel

विभाग