Jaya Bachchan : जया बच्चन यांना कधी हसताना पाहिलंय का? 'हे' फोटो पाहून नेटकरीही झाले अवाक्!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jaya Bachchan : जया बच्चन यांना कधी हसताना पाहिलंय का? 'हे' फोटो पाहून नेटकरीही झाले अवाक्!

Jaya Bachchan : जया बच्चन यांना कधी हसताना पाहिलंय का? 'हे' फोटो पाहून नेटकरीही झाले अवाक्!

Dec 30, 2024 01:39 PM IST

Jaya Bachchan Smiling Photo : अभिनेत्री जया बच्चन नेहमीच माध्यमांवर चिडताना किंवा रागवताना दिसल्या आहेत. मात्र, पहिल्यांदाच त्यांचं हसू कॅमेरात कैद झालं आहे.

Amitabh Bachchan, Jaya Bachchan and Abhishek Bachchan at the wedding reception.
Amitabh Bachchan, Jaya Bachchan and Abhishek Bachchan at the wedding reception.

Jaya Bachchan Smiling Photo : बॉलिवूडचे ‘शेहनशहा’ अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. नुकत्याच एका जवळच्या सहकाऱ्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला बच्चन दाम्पत्य उपस्थित राहिले होते. अमिताभ बच्चन, पत्नी जया बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन बच्चन यावेळी एकत्र दिसले. एबी कॉर्प या प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला बच्चन कुटुंब उपस्थित होते. 

पहिल्यांदाच जया बच्चन हसताना दिसल्या!

सोमवारी सकाळी एका पापाराझी इन्स्टाग्राम हँडलने लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावतानाचे बच्चन कुटुंबाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सॅटिन ब्लॅक कुर्ता पायजामासोबतच काळ्या शेरवानी परिधान केला होता. या लूकमध्ये ते एकदम डॅशिंग दिसत होते. अभिषेकने या रिसेप्शनसाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा निवडला होता. गुलाबी आणि केशरी रंगाच्या साडीत जया बच्चनही खूप सुंदर दिसत होत्या. त्यांच्यासोबतच राजेश, त्यांची पत्नी, मुलगा रिकीन यादव आणि त्याची नवीन सून सुरभी हे देखील दिसले. यावेळी फोटो पोज देताना बच्चन दाम्पत्य कॅमेऱ्यासमोर हसताना दिसले.

Neetu Singh: जया बच्चन पापाराझींशी असे का वागतात? रणबीर कपूरच्या आईने केली पोलखोल!

नेटकरी झाले अवाक्!

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे हे फोटो पाहून एका इन्स्टाग्राम युजरने कमेंट सेक्शनमध्ये म्हटले आहे की, ‘बापरे जया बच्चन हसत आहेत’. आणखी एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट सेक्शनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री ते राजकारणी बनलेल्या जया यांच्या कार्यक्रमांमध्ये पापाराझींशी झालेल्या वादावादीचा उल्लेख केला आहे. तर, दुसरीकडे काही लोक, ‘अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय कुठे आहे’, असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. गेल्या आठवड्यात अभिनेत्री आपली मुलगी आराध्या बच्चनसोबत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी मुंबईतून बाहेर गेली आहे. ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ हे बच्चन कुटुंबं नुकतेच आराध्याच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात स्टेज परफॉर्मन्सदरम्यान तिचा उत्साह वाढवण्यासाठी एकत्र आलेले दिसले होते.

अमिताभ बच्चन हे वयाच्या या टप्प्यावर देखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. अमिताभ लवकरच रिभू दासगुप्ता यांच्या कोर्टरूम ड्रामा ‘सेक्शन ८४’मध्ये दिसणार आहेत. अभिषेक रेमो डिसूझाची डान्स फिल्म ‘बी हॅपी’, तरुण मनसुखानीचा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल ५’ आणि सिद्धार्थ आनंदच्या क्राइम थ्रिलर ‘किंग’मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान, जया बच्चन सध्या विकास बहलच्या रोमँटिक कॉमेडी 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग'चे चित्रीकरण करत आहे.

Whats_app_banner