Jaya Bachchan On Navya’s Podcast: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता नंदा हिची मुलगी नव्या नवेली नंदा ही देखील मनोरंजन विश्व गाजवत आहे. नव्या अभिनय विश्वात सक्रिय नसली, तरी तिचे पॉडकास्ट खूप गाजत आहेत. नव्या नवेली नंदा हिचा पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या’चा दुसरा सीझन आता प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. या शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'व्हॉट द हेल नव्या २’ या शोचा पहिला ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्या गप्पांची झलक पाहायला मिळाली आहे. या शोच्या पहिल्या भागात श्वेता आणि जया बच्चन पाहुण्या म्हणून येणार आहेत.
या शोमध्ये दोघीही नव्याच्या हटके प्रश्नांची धमाल उत्तरे देणार आहेत. 'व्हॉट द हेल, नव्या २'च्या ट्रेलरमध्ये नव्या तिची आजी जया यांना त्यांच्या रोमँटिक दिवसांबद्दल आणि वैवाहिक आयुष्यातील काही क्षणांबद्दल खूप मनोरंजक प्रश्न विचारताना दिसली आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये नव्या नंदा 'जया-इंग' हा शब्द सतत वापरताना दिसली आहे. यानंतर तिने 'जया-इंग'चा नेमका अर्थ काय आहे हे देखील सांगितले आहे. जया बच्चन यांना सतत सगळ्यांना काही गोष्टी शिकवायची सवय आहे. यामुळेच नव्या त्यांना 'जया इंग' म्हणते.
'व्हॉट द हेल, नव्या २'च्या ट्रेलरमध्ये बच्चन कुटुंबाच्या या तीनही क्वीन एन्जॉय करताना दिसल्या आहेत. नव्या तिच्या आजीसोबत धमाल प्रश्नोत्तर करताना दिसली आहे. तर, जया बच्चन देखील तिच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसल्या आहेत. यावेळी लग्नाविषयी बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, 'रोमान्स खिडकीतून निघून जातो, लग्नानंतर सगळा रोमान्स संपून जातो.’ त्यांच्या या उत्तराने सगळ्यांनाच हसू येतं. सोशल मीडियावर या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता प्रेक्षकांना देखील या शोच्या पहिल्या एपिसोडची खूप उत्सुकता आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना आता आणखी काही धमाकेदार गोष्टी ऐकायला मिळणार आहेत.
या 'व्हॉट द हेल नव्या २’च्या या ट्रेलरवर प्रेक्षक देखील भरभरून कमेंट्स करत आहेत. या ट्रेलरवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'या तिघीही खूप विलक्षण, बुद्धिमान आणि सुंदर आहेत. नव्याच्या पॉडकास्टची आम्ही वाट पाहत आहोत.’ आणखी एकाने लिहिले की, ‘याही वेळी तू अशाच काही धमाकेदार पाहुण्यांना घेऊन येशील अशी आशा आहे.’
संबंधित बातम्या