सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमध्येही दुर्गामातेची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते आणि स्टार्स मोठ्या श्रद्धेने दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेत्री काजोलनेही नवरात्रीनिमित्त दुर्गामातेची पूजा केली आहे. त्यासाठी तिने मोठा मंडप घातला आहे. फुलांनी सजावट केली आहे. काजोल आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी करते. यावेळीही तेच पाहायला मिळाले. राणी मुखर्जी, अयान मुखर्जी सह अनेक बॉलिवूड स्टार्स दुर्गा मातेच्या दर्शनासाठी पोहोचले होते. दरम्यान, जया बच्चन यांच्या एण्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले.
काजोल दरवर्षी बॉलिवूड अनेक कलाकारांना दुर्गा मातेच्या दर्शनाचे आमंत्रण देते. अनेक कलाकार ही दुर्गामातेचे दर्शन घेतात. अभिनेत्री जया बच्चन या स्वत: काजोलने आयोजित केलेल्या दुर्गा मातेच्या कार्यक्रामाला पोहोचल्या आहेत. दुर्गा मंडपातून काजोल आणि जया बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात दोघीही हसताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. यावर बहुतांश युजर्सनी कमेंट करत जया बच्चन यांना ट्रोल केले आहे.
काजोल आणि जया बच्चन यांचा एकमेकांना मिठी मारतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो दुर्गापूजेच्या मंडपातील आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुर्गापूजेच्या दुसऱ्या दिवशी काजोलने केशरी रंगाची फुलांची साडी नेसली आहे. त्यावर काजोलने घातलेले स्लीव्हलेस ब्लाऊज अतिशय सुंदर दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने केसांमध्ये गजरा आणि गळ्यात सुंदर ज्वेलरी घातली आहे. जया बच्चन यांच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी गडद पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. व्हिडीओमध्ये दोघीही एकमेकींशी हसत बोलत असून मिठी मारताना दिसत आहेत. इतकंच नाही तर जया यांनी काजोलच्या गालावर किस ही केलं.
Manvat Murders Review: परभणीतील सत्य घटनेवरील थरारक कथा, वाचा 'मानवत मर्डर'चा रिव्ह्यू
काजोल आणि जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत युजर्सकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काजोल आणि जया यांना एकत्र पाहून युजर्सने त्यांना ट्रोल केले. एका युजरने लिहिलं, 'दो नकचढ़ी एक साथ।' दुसऱ्या एका यूजरने 'असं सूनेसोबत तरी वागायचं ना' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने "ती आपल्या सुनेसोबत कधीच अशी दिसली नाही" अशी कमेंट केली आहे. एका यूजरने 'जया बच्चन, ऐश्वर्या राय वगळता सर्वांसोबत आनंदी दिसते' अशी कमेंट केली आहे.
संबंधित बातम्या