Viral Video: ‘जवान’च्या लूकमध्ये चाहत्यांचा राडा; ‘टायगर ३’चे पोस्टर फाडणाऱ्यांना पोलिसांचा दणका!
Jawan VS Tiger 3: शाहरुख खान आणि सलमान खान यांचे चाहते नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांशी भिडताना दिसतात. मात्र, यावेळी त्यांची ही टशन थेट चित्रपटगृहात पाहायला मिळाली आहे.
Jawan VS Tiger 3: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट अवघ्या काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र, या यशाला आता शाहरुखच्या काही चाहत्यांनी गालबोट लावलं आहे. शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील कोल्ड वॉर संपला असला तरी, त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र ही धुसफूस चालूच असते. असाच काहीसा प्रकार एका चित्रपटगृहामध्ये घडला आहे. ‘जवान’चा लूक धारण करून आलेल्या काही तरुणांनी चित्रपटगृहात लावलेले ‘टायगर ३’चे पोस्टर फाडले.
ट्रेंडिंग न्यूज
शाहरुख खान आणि सलमान खान यांचे चाहते नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांशी भिडताना दिसतात. मात्र, यावेळी त्यांची ही टशन थेट चित्रपटगृहात पाहायला मिळाली आहे. यावेळी ‘जवान’ चित्रपटामधील शाहरुख खानसारखा चेहऱ्यावर पट्ट्या बांधलेला लूक धारण करून काही तरुण चित्रपटगृहात शिरले आणि त्यांनी सलमान खानच्या आगामी चित्रपटाचे अर्थात ‘टायगर ३’चे पोस्टर फाडण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सलमान खानच्या काही चाहत्यांना या कृत्याचा राग आला. यावेळी काही लोकांमध्ये अगदी सिनेस्टाईल हाणामारी सुरू झाली.
Imlie: गश्मीर महाजनी झळकलेल्या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भीषण अपघात; दुर्घटनेत एकाचा मृत्यू!
चित्रपटगृहातील हा राडा रोखण्यासाठी थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हा गोंधळ आणि राडा थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी ‘जवान’च्या वेशातील या तरुणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सदरचा हा प्रकार ठाण्यातील एका चित्रपटगृहात घडल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. या आधी देखील अनेकदा असा प्रकार घडलेला पाहायला मिळाला आहे. बॉलिवूडचा ‘किंग’ आणि ‘दबंग’ अर्थात शाहरुख खान आणि सलमान खान हे एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र आहे. त्यांची दोस्ती संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. मात्र, काही वर्षांपूर्वी एका गैरसमजामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. यामुळे गेली काही वर्ष दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, आता त्यांच्यातील हे वाद मिटले असून, ते पुन्हा एकत्र आले आहेत. दोन्ही कलाकारांमध्ये जरी दिलजमाई झाली असली, तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र अजूनही धुसफूस सुरूच असलेली पाहायला मिळते.