Jawan New Trailer: प्रदर्शनाच्या ६ दिवसांनी प्रदर्शित झाला 'जवान'चा नवा ट्रेलर, शाहरुखच्या डायलॉगने वेधले लक्ष
Shah Rukh Khan Film Jawan New Trailer: 'जवना'च्या या नव्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमधील शाहरुखचे डायलॉग सध्या चर्चेत आहेत.
सध्या बॉक्स ऑफिसवर केवळ ‘जवान’ची हवा पाहायला मिळत आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम केले आहेत. या चित्रपटाने केवळ तीनच दिवसात ५०० कोटी रुपयांचा पल्ला पार केला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा दिवस उलटले असताना सोशल मीडियावर चित्रपटाचा नवा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने स्वत: सोशल मीडियावर हा नवा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमधील त्याचे डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. जुन्या ट्रेलरमध्ये शाहरुखने "बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर" हा डायलॉग मारला होता. आता या ट्रेलरमध्ये विक्रम राठोर बोलताना दिसत आहे की, "वो अंत है तो मैं काल हूं। वो तीर है तो मैं ढाल हूं। हूं पुण्य पाप से परे, चिता से होती आग हूं। जो ना टले वो श्राप हूं। मैं तुम्हारा बाप हूं।"
वाचा: आलिया ही महेश भट्ट आणि तुझी मुलगी आहे?; पूजा भट्टने उत्तर देत व्यक्त केला संताप
शाहरुखने जवानचा हा नवा ट्रेलर शेअर करत "बेटा तो बेटा, बाप रे बाप!! अब ना रुकना चलने देना.. चित्रपटाचे तिकिट येथे बूक करना. जवान हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की पाहा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत" या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर हा नवा ट्रेलर चर्चेत आहे.
एकीकडे 'जवान' कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. तर, दुसरीकडे शाहरुख खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. शाहरुख खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला दोन दिवसांत मिळालेले यश पाहून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.
विभाग