सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 'पठाण' नंतर हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, या चित्रपटाचे गाणे प्रदर्शित झाले आहे.
शाहरुखने हे गाणे सोशल मीडियावर शेअर करत 'हे छैय्या छैय्या गाणे नाहीये. हे नॉट रमैय्या वस्तावैया आहे' असे कॅप्शन दिले आहे. सोबतच गाण्याचे गायक आणि इतर काही लोकांना शाहरुखने हे गाणे टॅग केले आहे. त्यांचे आभार मानत शाहरुखने 'या गाण्याच्या मागे खूप कहाण्या आहेत... मात्र ३१ तारखेला या कथा कळतील जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल. सध्या पुरता या गाण्याचा आनंद घ्या' असे लिहिले आहे.
वाचा: ‘जवान’च्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग शाहरुख खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!
शाहरुखने त्याच्या ट्वीटमध्ये शेवटी लिहिले की, 'जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.' नॉट रमैय्या वस्तावैया हे गाणे प्रदर्शित होतात प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने कमेंट करत 'नयन आणि शाहरुख खानची एकदम फ्रेश जोडी वाटत आहे' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने 'नॉट रमैय्या वस्तावैया देखील झूमे जो पठाणसारखे वेड लावणारे गाणे आहे. प्रेक्षक या गाण्यावर आनंदाने ठेका धरतील आणि आनंद घेतील' असे म्हटले आहे.
एका यूजरने 'शाहरुखला माहिती आहे की तो काय करत आहे. आणि हे एकदम चुकीचे आहे' असे म्हटले. आणखी एका यूजरने 'हे एक मास साँग आहे. हे एक सवय लावणारे गाणे आहे. नेहमी प्रमाणे शाहरुख चार्मिंग दिसत आहे' असे म्हटले आहे.
'जवान' चे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे, तर गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, दीपिका पदुकोण कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि प्रियामणी हे स्टार्सही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या