Jawan First Show: शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझच भारी! ‘या’ ठिकाणी सकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार चित्रपट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jawan First Show: शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझच भारी! ‘या’ ठिकाणी सकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार चित्रपट

Jawan First Show: शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझच भारी! ‘या’ ठिकाणी सकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार चित्रपट

Published Sep 05, 2023 09:26 AM IST

Jawan First Show Latest Update: 'जवान' हा २०२३च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे.

Jawan
Jawan

Jawan First Show Latest Update: अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशहा म्हटले जाते. शाहरुखचा चित्रपट म्हटला की, चाहत्यांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ दिसते. आता शाहरुख खान आणि नयनतारा यांचा आगामी चित्रपट 'जवान' हा २०२३च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे. या चित्रपटात ट्रेलर ३१ ऑगस्टला रिलीज झाला होता. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मोठ्या पडद्यावर शाहरुखच्या नव्या अवताराची जादू पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखच्या ‘जवान’चा फर्स्ट डे फर्स्ट शो आता पहाटे ५ वाजता पार पडणार आहे.

अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ हा शाहरुखचा दाक्षिणात्य दिग्दर्शकासोबतचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. चाहते या चित्रपटाची वाट बघत असतानाच आता कोलकातामध्ये 'जवान'चा पहिला शो सगळ्यात आधी पाहायला मिळणार असल्याची एक नवीन बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांच्या जोरदार मागणीमुळे, कोलकाताला ‘जवान’चा पहिला शो मिळाला आहे. कोलकातामधी चित्रपटगृहांमध्ये ७ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ‘जवान’ प्रदर्शित होणार आहे. ‘जवान’ या चित्रपटाचा पहिला शो ७ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता मिरज सिनेमागृहात दाखवण्यात येणार आहे.

Jawan Advance Booking: पुन्हा दिसला शाहरुख खानचा जलवा; ‘जवान’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगनेही मोडला रेकॉर्ड!

‘जवान’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तर, दुसरीकडे शाहरुख खान या चित्रपटाचे वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहता ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणार आहे, असे म्हणता येईल. ‘जवान’चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या 'जवान'ने त्याच्याच 'पठान' चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. सुरुवातीच्या अवघ्या २४ तासांत ‘जवान’ने ‘पठान’पेक्षा जास्त अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळवली आहे.

‘जवान’ या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच किंग खान याआधी कधीही न पाहिलेल्या भन्नाट अवतारामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान एक-दोन नव्हे तर तब्बल पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट येत्या गुरुवारी म्हणजेच ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner