बॉलिवूडचा किंग खान शाहरुख मुख्य भूमिकेत असणारा 'जवान' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपटाने ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली यांनी केले आहे. आज २१ सप्टेंबर रोजी अटली यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया अटली यांच्याविषयी काही खास गोष्टी...
२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा रानी' या चित्रपटातून अटलीने करिअरला सुरुवात केली. या पहिल्यावहिल्या चित्रपटानेच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाने ५०० मिलियन डॉलर्सची कमाई केली. त्यानंतर २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या थेरी या त्यांच्या चित्रपटाने धमाकाच केला होता. त्यानंतर त्यांनी कधीही मागे पाहिले नाही. त्यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसले.
वाचा: 'आपण यांना पाहिलंत का?' धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर
अटली यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरताना दिसतात. ते एका चित्रपटासाठी जवळपास १० ते १२ कोटी रुपये मानधन घेतात असे म्हटले जाते. जवान चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी मानधनात वाढ केल्याचे म्हटले जाते. अटली यांच्याकडे एकूण ५२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे. अटली यांनी जवान चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते.
अटलीच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याच्या पत्नीचे नाव कृष्णा प्रिया असे आहे. जवानच्या प्री-रिलीज इवेंटला तिने हजेरी लावली होती. जवान चित्रपटाच्या वेळी अटलीची पत्नी प्रेग्नंट होती. ३१ जानेवारी २०२३ रोजी त्यांच्या घरी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले. त्यांनी मुलाचे नाव काय ठेवले याबाबत माहिती समोर आलेली नाही.