मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jawan Box Office Collection: शाहरुखच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

Jawan Box Office Collection: शाहरुखच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

Harshada Bhirvandekar HT Marathi
Sep 09, 2023 09:00 AM IST

Jawan Box Office Collection Day 2: 'पठान' नंतर 'जवान' बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट अनेक विक्रम नोंदवेल आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असे म्हटले जात आहे.

Jawan
Jawan

Jawan Box Office Collection Day 2: तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करत शाहरुखने ‘पठान’मधून आपला जलवा दाखवला होता. आता पुन्हा एकदा शाहरुख खान एका नवीन अवतारात मोठ्या पडद्यावर दिसला आहे. इतकेच नाही तर, त्याने अनेक रेकॉर्डही केले आहेत. 'पठान' नंतर 'जवान' बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट अनेक विक्रम नोंदवेल आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल, असे म्हटले जात आहे. 'जवान'ने रिलीज होताच ७५ कोटींची कमाई केली. त्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. त्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशीच १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाला ही किमया जमली नव्हती.

ट्रेंडिंग न्यूज

सनी देओलच्या 'गदर २' ला १०० कोटींचा टप्पा पार करायला ३ दिवस लागले होते. मात्र, 'पठाण'ने दोन दिवसांतच १०० कोटींचा आकडा पार केला आहे. अशा परिस्थितीत आता शाहरुखच्या 'जवान'ची जादू बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे.

Aaliya Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीला दुबई सरकारने पाठवली नोटीस; नेमकं प्रकरण काय? वाचा...

‘जवान’ चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशीच ५३ कोटींची कमाई करून मोठा विक्रम रचला आहे. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन १२७.५० कोटी झाले. आता 'जवान' वीकेंडला देखील भरपूर कमाई करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यानुसार 'जवान'च्या हिंदी आवृत्तीने कमाईचा जबरदस्त आकडा पार केला आहे.

एकीकडे 'जवान' कमाईचे झेंडे फडकावत आहेत. तर, दुसरीकडे शाहरुख खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. शाहरुख खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला दोन दिवसांत मिळालेले यश पाहून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसली आहे. तर, साऊथ स्टार विजय सेतुपती देखील दमदार भूमिकेत दिसला आहे.

WhatsApp channel