मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणांच्या पार्थिवाला दिला खांदा

Javed Akhtar: जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणांच्या पार्थिवाला दिला खांदा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 16, 2024 05:24 PM IST

Munawwar Rana Death: सोमवारीच प्रसिद्ध शायर आणि कवी मुनव्वर राणा यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. त्यांच्या पार्थिवाला जावेद अख्तर यांनी खांदा दिला आहे.

Javed Akhtar
Javed Akhtar (Twitter)

प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांचे १५ जानेवारी रोजी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर मुनव्वर यांच्या घरी लखनऊला पोहोचले. त्यांनी मुनव्वर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, जावेद अख्तर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय शायरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.

मुनव्वर राणा यांच्या निधनानंतर संगीतसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी जावेद अख्तर तेथे पोहोचले होते. त्यावेळी जावेद अख्तर यांनी मीडियाशी संवाद साधला आणि शोक व्यक्त केले. 'भारतातल्या शायरीचे आणि कवितेचे खूप मोठे नुकसान मुनव्वर राणा यांच्या निधनामुळे झाले' असे ते म्हणाले.
वाचा: अन् हृतिकने मारली एक्स वाइफला मिठी, सर्वजण बसले पाहात

पुढे ते म्हणाले, “राहत इंदौरी, निदा फाजली आणि आता मुनव्वर राणा यांच्यासारख्या शायरांनी जगाचा निरोप घेतल्याने शायरीतली अदब हळूहळू लोप पावते आहे असे वाटू लागले आहे. त्यांच्या निधनामुळे आपले कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे.” जावेद अख्तर यांनी मुन्नवर राणा यांच्या पार्थिवाला खांदा देखील दिला. त्यांचा खांदा देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुनव्वर राणा हे प्रसिद्ध उर्दू कवी होते. त्यांनी अनेक गझल लिहिल्या आहेत. त्यांचा स्पष्टवक्ते आणि निर्भयपणा हा त्यांच्या कवितांमधून देखील दिसून यायचा. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे सांगत २०१४ मध्ये त्यांनी उर्दू साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला होता. कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी शपथ देखील त्यांनी घेतली होती.

WhatsApp channel

विभाग