मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jau Bai Gavat: मुलींसोबत अख्खा गाव भक्तीचा जागर करणार; ‘जाऊ बाई गावात’मध्ये देवीचा गोंधळ होणार!

Jau Bai Gavat: मुलींसोबत अख्खा गाव भक्तीचा जागर करणार; ‘जाऊ बाई गावात’मध्ये देवीचा गोंधळ होणार!

Feb 07, 2024 04:03 PM IST

Jau Bai Gavat Latest Episode: या जागरण सोहळ्यात संपूर्ण बावधन गाव सहभागी होणार असून, शोचा होस्ट हार्दिक जोशी आणि ‘जाऊ बाई गावात’चे टॉप ५ स्पर्धक देखील सहभागी होणार आहेत.

Jau Bai Gavat Latest Episode
Jau Bai Gavat Latest Episode

Jau Bai Gavat Latest Episode:जाऊ बाई गावात’ हा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. हा शो आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. ‘जाऊ बाई गावात’ या शो ला अंतिम पाच स्पर्धक देखील मिळाले आहे. याच पाच स्पर्धकांसोबत आता गावात देवीचा जागरण सोहळा रंगणार आहे. या जागरण सोहळ्यात संपूर्ण बावधन गाव सहभागी होणार असून, शोचा होस्ट हार्दिक जोशी आणि ‘जाऊ बाई गावात’चे टॉप ५ स्पर्धक देखील सहभागी होणार आहेत. या शोने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काची जागा मिळवली आहे. टॉप ५ स्पर्धकांपैकी कोण या स्पर्धेची विजेती होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

येत्या ११ फेब्रुवारी रोजी‘जाऊ बाई गावात’ या लोकप्रिय आणि बहुचर्चित मराठी शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. ‘जाऊ बाई जोरात’ या हटके शोचे हे पहिले पर्व विशेष गाजले. या शोमधील स्पर्धक,त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मनं यामुळे ‘जाऊ बाई गावात’ हा शो चांगलाच चर्चेत राहिला होता. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या फिनाले आठवड्यात जागा मिळवणाऱ्या पाच स्पर्धकांची नावे आता समोर आली आहेत. रमशा फारुकी,रसिक ढोबळे,संस्कृती साळुंके,स्नेहा भोसलेआणि श्रेजा म्हात्रे या स्पर्धकांनी ‘जाऊ बाई गावात’च्या ‘टॉप ५’ यादीत स्थान मिळवले आहे. या महाअंतिम सोहळ्याचा गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह निर्माण झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ashok Saraf: ‘प्रत्येक क्षणी त्यांचा अभिमान वाटतो’; अशोक सराफ यांच्यासाठी लेकाची खास पोस्ट!

धमाकेदार मनोरंजन आणि वेगवेगळे टास्क करताना झालेली धमाल या सगळ्यामुळेच या शोला रंगत आली. ३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'जाऊ बाई गावात’चेहे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठीची तयारी करत आहे. सीझनच्या विजेते पदाचा मुकुट मिळवण्याचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांना बघता येणार आहे. या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळेल. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे.

‘जाऊ बाई जोरात’च्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर खास पाहुणे बनून येणार आहेत. तर, त्यांच्यासोबत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर देखील पाहुणे म्हणून येणार आहेत. सोनालीने स्पर्धकांना दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार असणार आहे.

WhatsApp channel