मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jau Bai Gavat: हार्दिक जोशीला मिळणार खास सरप्राईज! ‘जाऊ बाई गावात’मध्ये येणार खास पाहुणी

Jau Bai Gavat: हार्दिक जोशीला मिळणार खास सरप्राईज! ‘जाऊ बाई गावात’मध्ये येणार खास पाहुणी

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 11, 2024 02:50 PM IST

Jau Bai Gavat Hardeek Joshi: पहिल्यांदाच सूत्रसंचालकाची भूमिका निभावणारा हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता त्याला या शोमध्ये एक गोड सरप्राईज मिळणार आहे.

Jau Bai Gavat Hardeek Joshi
Jau Bai Gavat Hardeek Joshi

Jau Bai Gavat Hardeek Joshi: मराठी मालिका विश्वात सध्या ‘जाऊ बाई गावात’ या शोने चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता हार्दिक जोशी सांभाळत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘राणादा’ बनून घराघरांत पोहोचलेला हार्दिक जोशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर, पहिल्यांदाच सूत्रसंचालकाची भूमिका निभावणारा हार्दिक जोशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता त्याला या शोमध्ये एक गोड सरप्राईज मिळणार आहे.

‘जाऊ बाई गावात’ हा एक हटके विषय असलेला कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमात काही तरुणी सहभागी झाल्या असून, त्या गावखेड्यातलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या तरुणी वेगवेगळ्या शहरी भागांतून आलेल्या असून, काही जनी तर अगदी परदेशातून आल्या आहेत. लक्झरी आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगणाऱ्या या तरुणी आता महाराष्ट्रातील बावधन या गावात येऊन तिथलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना अगदी शेण सारवण्यापासून ते दूध काढून, जेवण करण्यापर्यंतची सगळी काम स्वतः करावी लागत आहेत.

Marathi Serial TRP: नव्या वर्षात कोणत्या मालिकेने मारली बाजी? पाहा काय म्हणतोय टीआरपी रिपोर्ट...

या सगळ्या तरुणींना ही काम शिकवणारा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणारा सुत्रसंचालक म्हणू हार्दिक जोशी आपली भूमिका चोख बजावत आहे. हार्दिक जोशी या स्पर्धक तरुणींकडून वेगवेगळे टास्क करून घेत आहेत. आता या सगळ्या टास्क दरम्यान अभिनेता हार्दिक जोशी याला एक खास सरप्राईज मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या बावधन या गावात आता मकर संक्राती खास अंदाजात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी एक गोड पाहुणी गावात येणार आहे. ही पाहुणी हार्दिक जोशी याला सरप्राईज देण्यासाठी येणार आहे.

अभिनेता हार्दिक जोशी याची पत्नी-अभिनेत्री अक्षया देवधर ही मकर सक्रांत साजरी करण्यासाठी बावधन या गावात येणार आहे. अक्षया देवधर आपल्या पतीला मकर संक्रातीचं गोड सरप्राईज देणार आहे. तिळगुळ घेऊन आलेली अक्षया देवधर आता सगळ्यांचच तोंड गोड करणार आहे. या निमित्ताने हार्दिक जोशी याच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळणार आहे. तिच्या या सरप्राईजमुळे सगळेच खुश होणार आहेत.

WhatsApp channel