मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jau Bai Gavaat Winner: रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती

Jau Bai Gavaat Winner: रमशा फारुकी ठरली 'जाऊ बाई गावात'च्या पहिल्या पर्वाची विजेती

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2024 08:50 AM IST

Jau Bai Gavaat Finale: 'जाऊ बाई गावात' हा हटके कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता अखेर या कार्यक्रमाचा विजेता समोर आला आहे.

Jau Bai Gavaat Winner
Jau Bai Gavaat Winner

Jau Bai Gavaat Winner : छोट्या पडद्यावर एका नवाकोरा अन् आगळावेगळा असा 'जाऊ बाई गावात' हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता हार्दिक जोशी यांच्या हाती देण्यात आली. या शोमध्ये शहरात आणि परदेशात सगळ्या सुखसुविधांचा वापर करून लहानाच्या मोठ्या झालेल्या काही तरुणी थेट गावात जाऊन कुठलीही सुविधा न वापरता तिथल्या लोकांप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान अनेकदा वादांच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. आता या कार्यक्रमाचा विजेता समोर आला आहे.

मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. हे पर्व विशेष गाजले ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या या कार्यक्रमाने सर्वांची मन जिंकली. ११ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला खास पाहुणे लाभले होते ते म्हणजे आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर.
वाचा: थिएटरमध्ये जाळ अन् धूर! पवन कल्याणच्या चाहत्यांचे अनोखे प्रेम

‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात रमशा फारुकी ही महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी देण्यात आली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. रमशाने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, "Oh My God! तो क्षण जेव्हा सरानी माझे नाव घेतले आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि 'जाऊ बाई गावातच्या' पहिल्या पर्वातली विजेती आहे रमशा. तेव्हा मला वाटत होते की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटले खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता 'इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है" खरच बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा. मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचे आहे आणि जसे 'जाऊ बाई गावात' या शोला १०० % दिले आहे तसच पुढे ही दयायच आहे. कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसे राहायचे हे शिकवले. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतके आपल्यावर प्रेमही करू शकते."

WhatsApp channel

विभाग