ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांचा 'देवरा पार्ट १' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आज म्हणजेच 27 सप्टेंबररोजी प्रदर्शित झाला आहे. जान्हवी कपूरचा हा पहिलाच तेलगू चित्रपट आहे. तर सैफ अली खान या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही लोकांनी चित्रपटाविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. तर अनेकांना हा चित्रपट फारसा आवडला नाही.
जर तुम्ही सैफ अली खान आणि ज्युनियर एनटीआरचा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तिकीट बुक करण्यापूर्वी सोशल मीडिया युजर्सची प्रतिक्रिया नक्की वाचा. एका एक्स युजरने देवरा चित्रपटाविषयी लिहिले की, चित्रपटाची सुरुवात अतिशय शानदार आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे पार्श्वसंगीत मजेशीर आहे. दुसऱ्या एका युजरने ज्युनिअर एनटीआरच्या इंट्रोडक्शन सीनचे ही कौतुक केले आहे.
'देवरा' या चित्रपटात सैफ अली खान खलनायक बनला आहे. एक्स युजरने सैफ अली खानचा अभिनय भन्नाट केला आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'खलनायकाच्या भूमिकेसाठी सैफला अंडररेटेड आहे' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिसऱ्या एका यूजरने, 'चित्रपटातील अॅक्शन सीन्स हे अतिशय दमदार आहेत. एनटीआरची एण्ट्री एकदम कडक आहे. सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत उत्तम होते. कथा अधिक चांगली होऊ शकली असती, पण हा चित्रपट एकदा बघायलाच हवा' असा सल्ला दिला आहे.
एका एक्स युजरने लिहिले, 'देवराचा पहिला भाग प्लॅटफॉर्म सेट करतो, दुसरा भाग आग लावतो. चित्रपटाच्या शेवटी आपल्या लक्षात येईल की आपण केवळ चित्रपट पाहत नाही, तर आपण एका मोठ्या कथेचा भाग आहात.' दुसऱ्या एका यूजरने चित्रपटाचा पूर्वार्ध सरासरी असल्याचे म्हटले आहे. तर उत्तरार्ध कंटाळवाणा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एनटीआरचा अभिनय उत्तेजक असल्याचे बोलले जाते. सैफच्या अभिनयाचेही कौतुक झाले आहे. तर जान्हवी कपूरचं वर्णन या सिनेमात चांगलं करण्यात आलं आहे.
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?
तर एका युजरने, 'चित्रपटातील जान्हवी कपूरचा फोटो शेअर करत लिहिलं- तेरा ही जलवा. देवरा हा जान्हवी कपूरचा पहिला तेलगू चित्रपट आहे. ती खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे' असे म्हटले जाते.