Janhvi Kapoor Devara Song: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर पहिल्यांदाच बिग बजेट चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचे नाव 'देवरा' आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्येही उत्सुकता आहे. वेळोवेळी या चित्रपटाच्या नावाचे हॅशटॅग देखील सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात. एकंदरीतच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा आहे. पण, आता या चित्रपटातील एक गाणे समोर आले आहे, जे खूप रोमँटिक आहे. पण, आता ते सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.
या गाण्याचे शीर्षक 'धीरे धीरे' आहे, ज्यामध्ये जान्हवी आणि एनटीआरची रोमँटिक जोडी दिसत आहे. या गाण्यातून रोमँटिक वातावरण निर्माण होत असल्याचे लोक म्हणत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला हे गाणे जोरदार ट्रोल होत आहे. अनिरुद्ध रविचंदरने या गाण्याला संगीत दिले आहे, मात्र ते ऐकल्यानंतर लोकांनी त्याच्या संगीतावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या गाण्याला आता सोशल मीडियावर ‘कॉपी साँग’ म्हटले जात आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया...
श्रीलंकन गायिक योहानीचे 'मानिके मागे हिते' हे गाणे तुम्ही ऐकले असेलच, जे एकेकाळी भारतात व्हायरल झाले होते. या गाण्यामुळे योहानी इंटरनेट सेन्सेशन बनली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर योहानीचे गाणे शेअर करताना, एका युजरने अनिरुद्धला टॅग केले आणि लिहिले की, ‘हो आता रिपीट मोड चालू झाला आहे.’
हे गाणे शेअर करताना आणखी एका युजरने अनिरुद्धला टॅग केले आणि लिहिले, ‘कॉपी लेव्हल, हे काय आहे?’ तर, एका वापरकर्त्याने कमेंट केली की, ‘देवराचे गाणे आणि बीट 'मानिके मागे हिते' या गाण्यासारखेच आहेत.’ दुसऱ्या वापरकर्त्याने यावर ‘डिझास्टर व्हाईब्स’ अशी कमेंट केली आहे.
जर, तुम्ही ‘देवरा’ चित्रपटातील हे गाणे ऐकले, तर तुम्हाला सोशल मीडिया युजर्सचे हे शब्द खरे वाटतील. कारण, या गाण्यातून खरोखरच ‘डिझास्टर व्हाईब्स’ येत आहेत. कारण, या गाण्याचे बोल त्यांच्या संगीताशी नीट जुळत देखील नाहीत. गाणे ऐकल्यावर असे वाटते की, जणू काही नुकतेच गीत लिहिले आहे. कोरिओग्राफी विभागाची जबाबदारी प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांच्याकडे होती. मात्र, यावेळी त्याची मेहनतही दिसून येत नाही. हे गाणे १५ सेकंद ऐकले तर 'मानिक मागे हिते' मध्ये कधी पोहोचाल, हे समजणार देखील नाही. अगदीच डोकं न लावताही हे गाणे योहानीच्या गाण्याची कॉपी असल्याचे लक्षात येते.
चित्रपटाबाबत बरेच दिवस जे वातावरण तापले आहे ते या गाण्यात दिसत नाही. 'देवरा'चे हे दुसरे गाणे आहे, याआधी 'भय साँग' नावाचे गाणेही गायले होते, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या गाण्यातही 'देवरा'ची थीम दिसत होती. मात्र, एनटीआर-जान्हवीसोबत सैफ अली खानही या चित्रपटाचा एक भाग आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. हे चित्र २७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.