Janhvi Kapoor-Sara Tendulkar Clashes: भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी ती तिच्या लूकमुळे, तर कधी शुभमन गिलसोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत असते. सारा तेंडुलकर आणि जान्हवी कपूर या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र, आता याच मैत्रीमुळे दोघी चर्चेत आल्या आहेत. दोघींच्या मैत्रीत आता वितुष्ट आल्याचे बोलले जात आहे. जान्हवी कपूर हिने सारा तेंडुलकर हिला आता सोशल मीडियावरून अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे.
नुकतीच सारा तेंडुलकर ही जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत पार्टी करताना दिसली होती. त्यानंतर रागावलेल्या जान्हवी कपूरने सारा तेंडुलकरला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. जान्हवी कपूरने अलीकडेच 'कॉफी विथ करण'मध्ये शिखरसोबतच्या नात्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. यादरम्यान जान्हवीने शिखरला प्रेमाने ‘शिखरू’ म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले होते. एकीकडे जान्हवीने शिखरसोबतच्या नात्याची कबुली दिली. तर, दुसरीकडे काही दिवसांतच शिखर सारा तेंडुलकरसोबत पार्टी करताना दिसला.
सारा तेंडुलकर आणि शिखर पाहारिया यांना एकत्र पाहिल्यानंतर चाहतेही विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. कदाचित चाहत्यांनाही साराचे शिखरसोबत हँग आउट करणे आवडलेले नाहीये. यासोबतच जान्हवीलाही सारा आणि शिखर एकत्र फिरणे आवडलेले नाही. तिने सारा अली खानला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे. या आधी जान्हवी साराला फॉलो करत होती.
मात्र, ही केवळ अफवा आहे की, सत्य याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मात्र, असे म्हटले जात आहे की, सारा तेंडुलकरने जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारियासोबत आउटिंग केल्यामुळे दोघांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे त्यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे, असे म्हटले जात आहे.