कॉफी विथ करण हा शो कायमच कलाकारांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे कायमच त्यांच्या आयुष्यातील खुलासे करताना दिसतात. कॉफी विथ करणच्या आठव्या सिझनमध्ये आता श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीने हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी खासगी आयुष्यावर अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. दरम्यान दोघीही आईच्या आठवणीत भावूक झाल्या आहेत.
श्रीदेवीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी बराच काळ यावर बोलणे टाळत होत्या. त्यांना यावर बोलण्याची हिंमत नव्हती. कॉफी विथ करण शोमध्ये दोघींनीही हिंमत करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. जान्हवी म्हणाली की, 'जेव्हा मला फोन आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते आणि खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मी रडत तिच्या खोलीत गेले. मला आजही लक्षात आहे जेव्हा मी तिच्या खोलीत गेले तेव्हा तिने रडणे थांबवले. ती माझ्या जवळ येऊन बसली आणि मला शांत करत होती. त्यानंतर आजपर्यंत मी तिला कधीच रडताना पाहिले नाही.'
वाचा: परदेशात शिफ्ट झालेली माधुरी दीक्षित भारतात का परतली? डॉ. नेनेंनी सांगितले कारण
यावर खुशीने देखील प्रतिक्रिया दिली. 'मला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की मला सगळ्यांसाठी सर्वात आधी स्वत:ला सांभाळावे लागणार आहे. कारण मानसिकदृष्ट्या मी थोडी मजबूत आहे' असे खुशी म्हणाली. खुशी आणि श्रीदेवी यांच्यामध्ये एक साम्य आहे ते देखील जान्हवीने सांगितले. ते म्हणजे त्या दोघीही कायम शांत असतात आणि कॅमेरासमोर येऊन धमाका करतात.