Poisonous Insect: विषारी किड्याने स्पर्श करताच अभिनेत्याला आला हार्ट अटॅक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Poisonous Insect: विषारी किड्याने स्पर्श करताच अभिनेत्याला आला हार्ट अटॅक

Poisonous Insect: विषारी किड्याने स्पर्श करताच अभिनेत्याला आला हार्ट अटॅक

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 24, 2024 07:26 PM IST

Jamie Dornan: एका किड्याने स्पर्श केल्यामुळे अभिनेत्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Jamie Dornan
Jamie Dornan

नुकताच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अभिनेत्याला विषारी किड्याने स्पर्ध केल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यानंतर तातडीने अभिनेत्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. अभिनेता लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत.

हा अभिनेता कोण? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. हा हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता जेमी डोर्नन आहे. त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जेमी हा पोर्तुगल ट्रीपवर गेला होता. ट्रिपवर असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला. तो विषारी किड्याच्या संपर्कात आल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
वाचा: बार्बी ते ओपेनहायमर; 'या' चित्रपटांना मिळाले ऑस्करमध्ये नामांकन

जेमी हा त्याच्या व्यग्र वेळापत्राकातून वेळ काढून पोर्तुगालमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. तेथे त्याने एक रिसॉर्ट बूक केले होते. या रिसॉर्टवर त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. सुरूवातीला अभिनेत्याला वाटले की, जास्त ड्रिंक्स केल्यामुळे त्याला त्रास होत आहे. मात्र, अभिनेत्याची तब्यते खालावत जात होती. त्याला नंतर कळाले की, हा त्रास आपल्याला कशामुळे होत आहे.

जेमीने याविषयी सांगितले की, "ट्रिपवर असताना तो मोठ्या अडचणीमध्ये सापडला. इतकेच नाही तर पाय सुन्न पडला होता. हार्ट अटॅकची पूर्ण लक्षणे दिसत होती. मी खूप जास्त हेल्दी व्यक्ती आहे आणि मी कधीच विचार करू शकत नव्हतो की, मलाही कधी हार्ट अटॅक येईल. वीस मिनिटांमध्ये माझे पूर्ण शरीर हे सुन्न पडले होते."

Whats_app_banner