Jailer: रजनीकांतच्या ‘जेलर’मुळे निर्माते झाले मालामाल! ‘कावालया’ फेम संगीतकाराला दिली आलिशान गाडी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jailer: रजनीकांतच्या ‘जेलर’मुळे निर्माते झाले मालामाल! ‘कावालया’ फेम संगीतकाराला दिली आलिशान गाडी

Jailer: रजनीकांतच्या ‘जेलर’मुळे निर्माते झाले मालामाल! ‘कावालया’ फेम संगीतकाराला दिली आलिशान गाडी

Updated Sep 05, 2023 10:37 AM IST

Jailer Kaavaalaa Song Composer Anirudh Ravichander: रजनीकांत 'जेलर' चित्रपटामधून दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतले आहेत. सगळेच सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत.

Jailer Kaavaalaa Song Composer
Jailer Kaavaalaa Song Composer

Jailer Kaavaalaa Song Composer Anirudh Ravichander: रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. १० ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने जगभरात देखील खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत तब्बल ६०० कोटी रुपयांचे शानदार कलेक्शन केले आहे. ‘थलायवा’ रजनीकांत 'जेलर' चित्रपटामधून दोन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतले आहेत. सगळेच सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

‘जेलर’च्या यशानंतर संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांना सन ग्रुपच्या चेअरमन कलानिती मारन यांच्याकडून मोठ्या रकमेचा धनादेश मिळाला आहे. सन पिक्चर्सनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कलानिती मारन अनिरुद्धला हा भरघोस रकमेचा चेक सुपूर्द करताना दिसले आहेत. म्युझिक डायरेक्टर अनिरुद्ध यांना ‘जेलर’च्या यशानंतर मोठा चेक मिळाला आहे, असे कॅप्शन लिहिले आहे.

Teachers Day 2023: राणी मुखर्जी ते शाहरुख खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारली शिक्षकांची भूमिका

सन ग्रुपच्या चेअरमन कलानिती मारन यांनी केवळ चेकच दिला नाही, तर संगीतकार अनिरुद्ध रविचंदरला एक चकचकीत आलिशान पोर्श कारही भेट दिली आहे. याचा व्हिडीओ अनिरुद्धने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनिरुद्ध पोर्शे पाहून खूप आनंदी झालेले दिसत आहेत. यापूर्वी निर्मात्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना देखील एक आलिशान कार भेट म्हणून दिली होती.

अनिरुद्धने ‘जेलर’ या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. प्रेक्षकांना देखील या चित्रपटातील गाणी खूप आवडली आहेत. कलानिती मारन यांच्यासोबत अनिरुद्ध रविचंदर यांचा हा चौथा चित्रपट आहे. ‘कोलमावु कोकिला’, ‘डॉक्टर’ आणि ‘बीस्ट’नंतर ‘जेलर’ हा अनिरुद्धचा चौथा चित्रपट आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच 'जेलर'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘जेलर’ हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. ‘जेलर’मध्ये विनायकन, रम्या कृष्णन, वसंत रवी, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Whats_app_banner