Rajinikanth Jailer 2 Teaser Out : रजनीकांतच्या जेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यानंतर आता निर्मात्यांनी ‘जेलर २’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच मकर संक्रांतीच्या निमित्ताने ‘जेलर २’चा अनाउंसमेंट टीझर रिलीज झाला आहे. त्यानंतर चाहते फक्त हा चित्रपट थिएटरमध्ये कधी रिलीज होतोय यांची वाट पाहत आहेत. जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. रजनीकांत वयाच्या ७४व्या वर्षीही आपल्या दमदार अॅक्शनने आजच्या तरुण कलाकारांना मागे टाकत आहेत.
दक्षिण सुपरस्टार रजनीकांतच्या २०२३च्या ब्लॉकबस्टर चित्रपट जेलरच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांची अधीरता अधिक न वाढवता चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोंगलच्या मुहूर्तावर 'जेलर २'चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये ७४ वर्षीय अभिनेता जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे, जे पाहून प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने सन पिक्चर्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘जेलर २’ या चित्रपटाचा अॅक्शनपॅक्ड टीझर शेअर केला आहे. ४ मिनिटांच्या या टीझरमध्ये रजनीकांत चष्मा घालून शत्रूंना शोधत आणि मारत आहेत. टीझरचा शेवटचा सीन अतिशय धमाकेदार आहे, जेव्हा रजनीकांत आपल्या डोळ्यांवरून चष्मा काढतात. अभिनेत्याचा असा स्वॅग इतर कोणत्याही हिरोमध्ये दिसणार नाही.
‘जेलर २’च्या टीझरची सुरुवात दिग्दर्शक नेल्सन आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्यात नव्या पटकथेवर झालेल्या चर्चेने होते आणि त्यानंतर रजनीकांतची धमाकेदार एन्ट्री होते. रक्ताने माखलेला पांढरा शर्ट, एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन ते दिसत आहे. या अभिनेत्याला असं पाहून प्रेक्षक आता हा चित्रपट चित्रपटगृहात कधी येतोय यांची वाट बागहत आहे.
रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रेक्षकांना भरपूर आवडला होता. ‘जेलर’ या चित्रपटाची कथा मुथुवेल पांडियन या निवृत्त जेलरची आहे, जो आपल्या मुलाच्या हत्येनंतर त्याचा बदला घेण्यासाठी एका भयानक गुन्हेगारी टोळीशी लढतो. कौटुंबिक, न्याय आणि सूडाची भावना दर्शविणारा हा चित्रपट दमदार अॅक्शन आणि इमोशनल ड्रामाचा मिलाफ होता. आता ‘जेलर २’च्या कथेची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. रजनीकांत यांचा हा चित्रपट जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, तेव्हा चित्रपटगृहांमध्ये नक्कीच धमाका होईल.
संबंधित बातम्या