मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  छोट्या पडद्यावरची ‘म्हाळसा’ राजकारणाच्या रिंगणात उतरणार? सुरभी हांडेच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!

छोट्या पडद्यावरची ‘म्हाळसा’ राजकारणाच्या रिंगणात उतरणार? सुरभी हांडेच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 22, 2024 12:58 PM IST

सुरभीने राजकारणावर मोठ भाष्य केले आहे. यादरम्यान तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

छोट्या पडद्यावरची ‘म्हाळसा’ राजकारणाच्या रिंगणात उतरणार? सुरभी हांडेच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!
छोट्या पडद्यावरची ‘म्हाळसा’ राजकारणाच्या रिंगणात उतरणार? सुरभी हांडेच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण!

‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘म्हाळसा देवी’ अर्थात अभिनेत्री सुरभी हांडे सध्या प्रचंड चर्चेत आहे. लवकरच तिचा ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या मराठी चित्रपटातून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुरभी हांडे चर्चेत आली आहे. ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, मनोज जरांगे-पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. दरम्यान, ती वेगवेगळ्या मुलाखती देताना देखील दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यातीलच एका मुलाखती दरम्यान सुरभीने राजकारणावर मोठ भाष्य केले आहे. यादरम्यान तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती आता राजकारणाच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर, या प्रश्नावर देखील तिने स्वतः उत्तर दिले आहे. नुकतीच सुरभी हांडे हिने ‘प्लॅनेट मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुरभी राजकारणाविषयी भरभरून बोलली. एकीकडे तिचा ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट राजकारणाच्याच विषयावर बेतलेला असताना, आता तिचं राजकीय वक्तव्य चर्चेत आलं आहे.

यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

काय म्हणाली सुरभी हांडे?

राज्यातल्या एकंदरीत राजकीय परिस्थितीवर बोलताना सुरभी हांडे म्हणाली की, ‘आज जिथे तिथे बीजेपी आहे. त्यामुळे अनेक गोष्टी छान घडत आहेत. आता लोकांना ज्या गोष्टींच्या अपेक्षा नव्हत्या, अशाही छान छान गोष्टी भारतात होत आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा... मला असं वाटतं की, याचा छोटासा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. पण, बघूया... एक गोष्ट मी आताच सांगते की, राजकारणात नाही, पण सांस्कृतिक गोष्टींसाठी मी नक्कीच काहीतरी काम करेन.’

लवकरच येणार चित्रपटातून भेटीला!

सुरभीच्या या वक्तव्यामुळे आता ती लवकरच राजकारणाच्या क्षेत्रात देखील दिसू शकते, असं सगळेच म्हणताना दिसतात. मात्र, आपण राजकारणात तर येणार नाही, समाजकारणासाठी नक्कीच काहीतरी करू, असं म्हणत तिने चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. सुरभी हांडे हिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र, छोट्या पडद्यावरील जय मल्हार या मालिकेतील ‘म्हाळसादेवी’ या पात्रामुळे सुरभीला विशेष ओळख मिळाली. यानंतर आता सुरभी चित्रपटांमध्ये देखील झळकणार आहे. तिचा ‘संघर्षयोद्धा’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रोहन पाटील, सागर कारंडे, संदीप पथक आणि मोहन जोशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

IPL_Entry_Point