स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत श्रावणी सोमवार विशेष भाग
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत श्रावणी सोमवार विशेष भाग

स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ, 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत श्रावणी सोमवार विशेष भाग

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Aug 02, 2024 02:59 PM IST

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत सोमवार विशेष भाग पार पडणार आहे. या भागात स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ होणार आहे.

Jai Jai Swami Samartha
Jai Jai Swami Samartha

'जय जय स्वामी समर्थ' ही कलर्स मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत स्वामींच्या महतीचे वर्ण केले जात आहे. स्वामींचा प्रत्येक विचार हा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जात आहे. आता मालिकेत यंदाचा श्रावणातला पहिला सोमवार, ‘श्रावणी सोमवार विशेष भाग’ सादर होणार आहे. हा भाग पाहण्यासाठी आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.

‘श्रावणी सोमवार विशेष भाग’ अतिशय भक्तिभावाने साजरा होणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत आतापर्यंत आपण अनेक अतिशय सुंदर सोहळे भव्यतेने पार पडताना पाहिले आहेत. स्वामींचे भक्त अतिशय भक्तीभावाने या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. या सोहळ्यादरम्यान भक्तांनी स्वामींच्या अनेक लीलांची अनुभुती घेतली आहे.

भक्तीभावाने स्वामींची पूजा होणार

स्वामींचे लाडके सेवेकरी बाळप्पा आणि गया अतिशय भक्तीभावाने स्वामींची पूजा करताना दिसणार आहेत. दरम्यान स्वामींवर दुग्धाभिषेक होताना दिसणार आहे. बेलपत्रांनी शास्त्रोक्त पद्धतीने विलोभनीय पूजा होणार आहे. शंकराची सहस्त्र नामं घेत ती स्वामी चरणावर वाहिली जातील.

प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

कलर्स मराठी वाहिनीने 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये स्वामी एक विचार सांगताना दिसत आहेत. ‘चांगुलपणा हा शून्यासारखा असतो तो ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमी जास्त असते. अंगी चांगुलपणा बाळगा तुमची किंमत आपोआप वाढेल’ असे ते बोलताना दिसत आहेत. कलर्स मराठी वाहिनीने हा मालिकेतील प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
वाचा: 'तुम सब उसको डरा सकते हो, हरा नहीं सकते', उत्कर्ष शिंदेचा गोलिगत सूरज चव्हाणला पाठिंबा

या संपूर्ण पूजेला स्वामींच्या भक्त उद्धराची अक्कलकोटमधली एक गोष्ट जोडली गेली असून महादेवांच्या भेटीची आस बाळगलेल्या गौरीला स्वामींमधल्या शिवतत्वाच्या दिव्य अनुभूतीचा प्रारंभ श्रावणी सोमवार विशेष भागा पासून सुरू होणार आहे. येत्या सोमवारी ५ ऑगस्टला रात्री ८ वाजता साजरा होणारा 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतला श्रावणी सोमवारचा विशेष भाग भक्तांसाठी खूप खास असणार आहे. तसेच प्रेक्षकांमध्ये या मालिकेच्या आगामी भागाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner