'तिने जे शब्द वापरले ते चुकीचे', बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून पतीने केली पोस्ट-jahnavi killekar husband reaction on paddy kambale insult ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तिने जे शब्द वापरले ते चुकीचे', बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून पतीने केली पोस्ट

'तिने जे शब्द वापरले ते चुकीचे', बिग बॉसच्या घरातील जान्हवीचे वागणे पाहून पतीने केली पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 21, 2024 02:37 PM IST

Jahnavi Killekar Husband Reaction: जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात पॅडी कांबळेविषयी केलेले वक्तव्य अतिशय लाजिरवाणे आहे. तिच्यावर टीकेचा भडिमार होताना दिसत आहे. हे सर्व पाहून तिच्या पतीने निवेदन जारी केले आहे.

Jahnavi Killekar Husband Reaction
Jahnavi Killekar Husband Reaction

Bigg Boss Marathi Season 5 : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन दिवसेंदिवस रंगतदार ठरत आहे. नुकताच बीबी करन्सीसाठी घरातील स्पर्धकांना टास्क देण्यात आला होता. त्यासाठी स्पर्धकांना टीम ए आणि टीम बी अशी विभागणी करण्यात आली. टीम एमध्ये निक्की, जान्हवी, वैभव, इरीना, सूरज आहेत. दरम्यान, जान्हवी किल्लेकरची जीभ घसरली आहे. तिने टीम बी मधील स्पर्धक पॅडी कांबळेचा अपमान केला. त्याच्या करिअरवर बोट उचलले ते पाहून जान्हवीवर टीकेचा भडिमार होत आहे. त्यानंतर जान्हवीच्या पतीने एक निवेदन जारी केले आहे.

सध्या सोशल मीडियावर जान्हवीने पॅडीच्या करिअरवरुन केलेले वक्तव्य अतिशय लाजिरवाणे आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी टीकेचा भडिमार केला आहे. त्यानंतर जान्हवीचा पती किरण किल्लेकर मैदानात उतरला आहे. त्याने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्याने जान्हवीचे शब्द चुकीचे होते असा उल्लेख केला आहे.

काय आहे जान्हवीच्या पतीचे म्हणणे?

जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करियर बद्दल बोलण योग्य नाही पण जेव्हा हे घडल तेव्हा चे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे, ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचे घर साधं घर नाही, तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील, असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत, असंही नाही. तिथे गेल्या नंतर लोक बदलतात, त्यांचे वागण्याची पद्धत बदलते, याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही.

Jahnavi Killekar
Jahnavi Killekar

लोकांनी उगच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात, ते सगळं बरोबर. जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी ह्या बाईचा एक दिवस पाण उतारा करीन. अंकिता बोलते, हिच्या मध्येच खूप खोडी आहेत, अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात, कॅमरा आपल्याकडे आहे, नका बोलू, तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षा ताई सिनियर नव्हत्या म्हणजे?

जर जान्हवी बोलली, तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले, पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ते सेवा करते. ते फक्त फुटेजसाठी असतात, असं लोकांचं मत आहे. जरा नीट बघा 24 तासाच्या प्रवासात काय-काय घडत आपल्याला याची माहिती नसते, ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते. त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं, कसं उत्तर देतं आणि का देत याचा पण विचार करा. बसं, बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगे सारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळू हळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.
वाचा: "झुंड में भेडिये आते हैं, शेर अकेला ही आता है", रितेश देशमुखने केले सूरज चव्हाणचे कौतुक

काय आहे नेमकं प्रकरण?

'बिग बॉस मराठी'च्या घरात नुकताच पंचनामा टास्क पार पडला. या टास्कमध्ये दोन्ही टीम्सना एकमेकांच्या विधानांवर सत्य की असत्य ठरवून बझर वाजवायचा होता. बिग बॉस एका टीमच्या सदस्याविषयी एक वक्तव्य करणार होते. तर, आपल्याविषयी केलेले हे वक्तव्य खरे आहे की खोटे, हे आधी त्या स्पर्धकाने ठरवायचे होते. त्यानंतर स्पर्धकाने दिलेल्या उत्तराशी विरुद्ध टीम सहमत आहे की नाही, हे त्यांनी सांगायचे होते. या खेळात नियमांनुसार सगळ्यांनीच लाल बझर वाजवल्याने आता एकाही टीमला बीबी करन्सी मिळालेली नाही. मात्र, हा टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा टीम बी मधील सदस्यांवर टीका करताना दिसली. यावेळी जान्हवी किल्लेकर हिने पंढरीनाथ कांबळे यांना जोकर, विदुषक म्हणत ‘त्यांनी आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग केली. आता इथे येऊन फुटेज खातायत’, असे म्हटले.