एकेकाळी बोलण्याच्या अनोख्या शैलीने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजे जॅकी श्रॉफ. ते सध्या चित्रपटसृष्टीमध्ये फारसे सक्रीय नसले तरी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांचा साधेपणा नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते हातात फडके घेऊन पायऱ्या पुसताना दिसतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जॅकी श्रॉफ हे राम मंदिराच्या पायऱ्या पुसताना दिसत आहेत. पण हे राम मंदिर अयोध्येमधील नसून मुंबईतील आहे. या राम मंदिराच्या पायऱ्यांवर जॅकी श्रॉफ हे हातात फडके घेऊन मारताना दिसतात आहेत. दरम्यान, जॅकी यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पँट आणि डोक्यावर टोपी घातली आहे. जॅकी श्रॉफ यांचा हा साधेपणा सर्वांना भावत आहे.
वाचा: वडिलांचा नकार, पहिल्या पत्नीसोबत सतत भांडणे; वाचा जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची लव्हस्टोरी
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने “जॅकी श्रॉफ एकमेव अशी व्यक्ती आहे की, ज्यांचे पडद्यावर आणि पडद्याबाहेरचेही राहणीमान साधे आहे" असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने “शून्यातून अभिनेता बनलेल्या व्यक्तीला नेहमीच त्याचे महत्त्व कळते” असे म्हणत जॅकी श्रॉफ यांचे कौतुक केले आहे. चाहत्यांनी जॅकी यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांची 'क्रिमिनल जस्टीस' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजमधील त्यांची भूमिका कौतुकास्पद होती. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. या सीरिजमध्ये विक्रांत मेसी आणि पंकज त्रिपाठी देखील आहेत. तसेच त्यांचा ‘मस्ती में रहने का’ हा चित्रपट देखील ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिका होत्या.
संबंधित बातम्या