Jackie Shroff Birthday : बस स्टॉपवर झाली पहिली भेट, मग बांधली लग्नगाठ! फिल्मी कथेसारखीच आहे जॅकी श्रॉफची लव्हस्टोरी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jackie Shroff Birthday : बस स्टॉपवर झाली पहिली भेट, मग बांधली लग्नगाठ! फिल्मी कथेसारखीच आहे जॅकी श्रॉफची लव्हस्टोरी

Jackie Shroff Birthday : बस स्टॉपवर झाली पहिली भेट, मग बांधली लग्नगाठ! फिल्मी कथेसारखीच आहे जॅकी श्रॉफची लव्हस्टोरी

Feb 01, 2025 09:04 AM IST

Happy Birthday Jackie Shroff : जॅकी श्रॉफची प्रेम कथा एखाद्या चित्रपटातील प्रेमकथेपेक्षा कमी नाही. पहिल्याच नजरेत तो प्रेमात पडला होता.

Actor Jackie Shroff (ANI Photo)
Actor Jackie Shroff (ANI Photo) (Girish Srivastav)

Jackie Shroff Birthday Special : बॉलिवूडमध्ये अनेक अप्रतिम अभिनेते आहेत, त्यापैकी काही असे आहेत की त्यांनी त्यांच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वामुळे लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. यापैकी एक नाव जॅकी श्रॉफचेही आहे. जॅकी इतर अभिनेत्यांपेक्षा खूप वेगळा आहे, मग तो त्याच्या बोलण्यात किंवा त्याच्या पेहरावात. पण आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे जग्गूदादाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. या अभिनेत्याने १९८२ मध्ये 'स्वामी दादा' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तो अजूनही चित्रपट जगतात सक्रिय आहे. चित्रपटांचा विषय सोडला तर, त्याचे वैयक्तिक आयुष्यही खूप रंजक राहिले आहे.

जॅकी श्रॉफ यांचे बालपण गरिबीत गेले. त्याचा जन्म १ फेब्रुवारी १९५७ रोजी झाला. त्याच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे तर, त्याने कधीही चित्रपटात येण्याचा विचार केला नव्हता, पण एके दिवशी त्याला मॉडेलिंग करण्याची ऑफर चालून आली. त्यावेळी जग्गूदादा नोकरीच्या शोधात होता, म्हणून त्याने ती ऑफर स्वीकारली. अशा प्रकारे त्याची मनोरंजन विश्वात एंट्री झाली. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याची प्रेम कथा एखाद्या चित्रपटातील प्रेमकथेपेक्षा कमी नाही. पहिल्याच नजरेत तो प्रेमात पडला होता. मग ते प्रेम व्यक्त झालं आणि नंतर त्यांचं लग्न झालं. मात्र, हे सगळं वाटतं तितकं सोपं नव्हतं.

Jackie Shroff Birthday: करिअरच्या सुरुवातीला चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफचे खरे नाव काय? जाणून घ्या

कशी झाली पहिली भेट?

जॅकी आणि त्याची पत्नी आयशा यांची भेट अगदी लहान वयात झाली होती. एकदा अभिनेत्याने आयशाला बस स्टँडवर पहिल्यांदा पाहिले होते. तेव्पासून त्यांच्यात संभाषण सुरू झाले, त्याच वेळी जॅकी पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. जॅकी सुरुवातीपासूनच त्याच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखला जातो. त्यावेळीही आयशाला पाहताच तो तिच्याशी बोलायला गेला आणि तिला स्वतःबद्दल सांगितले. मात्र, त्यावेळी दोघांमध्ये विशेष काही बोलणे घडले नाही. दोघांची भेट झाली तेव्हा आयशा फक्त १३ वर्षांची होती. यानंतर दोघेही कोणत्या ना कोणत्या बहाण्याने बोलत राहिले आणि त्याच दरम्यान त्यांची कहाणीही सुरू झाली.

नात्यात आल्या अनेक अडचणी!

दोघांचे नाते खूप चांगले चालले होते पण सर्वात मोठी अडचण ही होती की जॅकी श्रॉफ चाळीत राहणारा मुलगा होता. तर, आयशा खूप मोठ्या सधन कुटुंबातील होती. पण तिने आईच्या विरोधात जाऊन जॅकी श्रॉफशी लग्न केले. मात्र, केवळ आयशाची आईच नाही तर अभिनेत्याची जुनी मैत्रीण, जी त्यावेळी अभ्यासासाठी अमेरिकेला गेली होती, हीही या नात्यात मोठी अडचण होती. जेव्हा आयशाला त्याच्याबद्दल कळले तेव्हा तिने तिला पत्र लिहून आपल्या आणि जॅकी श्रॉफच्या नात्याबद्दल सांगितले. ५ जून १९८७ रोजी दोघांनी लग्न केले, आजही ते बॉलिवूडचे बेस्ट कपल म्हणून ओळखले जातात.

Whats_app_banner