Nana Patekar: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन-its time to choose your government say nana patekar to farmers ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nana Patekar: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

Nana Patekar: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 05, 2024 07:42 PM IST

Nana Patekar : नाना पाटेकर यांनी नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कोणते सरकार निवडायचे याबाबत आवाहन केले.

Nana Patekar on farmer protest
Nana Patekar on farmer protest

Nana Patekar on Farmer Protest: गेल्या काही दिवसांपासून देशभरात शेतकरी आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी "सरकारकडे मागू नका, तर कुठले सरकार आणायचे हे ठरवा" असे आवाहन केले आहे. त्यासोबतच ते राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर देखील भाष्य केले आहे. जाणून घ्या नाना नेमके असे का म्हणाले?

नुकताच नाना यांनी नाशिकमधल्या शेतकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. “आधी ८० ते ९० टक्के शेतकरी होते. आता शेतकऱ्यांची टक्केवारी ५० ते ६० वर आली आहे. तुम्ही सरकारकडे काही मागू नका. आता कुठले सरकार आणावे, याचा निर्णय घ्या. मला राजकारणात जाता येत नाही. कारण माझ्या पोटात जे आहे ते ओठांवर येते. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मला त्या पक्षातून काढून टाकतील. असे करत करत महिनाभरात सगळेत पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचे तिथे? इथे तुमच्यासमोर म्हणजेच आमच्या शेतकरी बांधवांसमोर आम्ही मोकळेपणे बोलू शकतो” असे नाना पाटेकर म्हणाले.
वाचा: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

पुढे सरकारला सवाल करत नाना म्हणाले की, “जर मी आत्महत्या केली तरी पुढच्या जन्मी शेतकरी म्हणूनच जन्म घेणार. शेतकरी असं कधीच म्हणणार नाही की मला शेतकऱ्याचा पुनर्जन्म नको. आपल्याला जनावरांची, प्राण्यांची भाषा समजते. मग योग्य वेळी तुम्हीला शेतकऱ्यांची भाषा का बोलता येत नाही.”
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील विरोधी पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. भाजपनंही तिसऱ्यांदा सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे.
वाचा: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्...; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर यांच्या चित्रपटांविषयी

अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘ओले आले’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यापूर्वी त्यांचा वॅक्सिन वॉर चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता नाना पाटेकर कोणत्या चित्रपटात दिसणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

विभाग