OTT: इस्राइलशी संबंधित 'या' ५ सीरिज आणि सिनेमा पाहून येईल डोळ्यांत पाणी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT: इस्राइलशी संबंधित 'या' ५ सीरिज आणि सिनेमा पाहून येईल डोळ्यांत पाणी

OTT: इस्राइलशी संबंधित 'या' ५ सीरिज आणि सिनेमा पाहून येईल डोळ्यांत पाणी

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 09, 2023 04:28 PM IST

Israeli Spy Movies And Web Series: इस्राइलशी संबंधीत अशा काही सीरिज आणि चित्रपट आहेत ज्यामध्ये स्पाय, दहशतवादी हल्ले आणि या सगळ्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे चित्ररण करण्यात आले आहे

Israeli
Israeli

हमास या दहशतवादी संघटनेने इस्राइलवर केलेल्या हल्ल्यामुळे सारे जग हादरले आहे. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. आतापर्यंत अनेकांनी प्राण गमावले आहेत. इस्रायलमधील भयंकर दृश्य समोर येत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा इस्राइलमध्ये काही ठिकाणी बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. आज आपण इस्राइलवर आधारित काही सीरिजविषयी जाणून घेणार आहोत.

इस्राइलशी संबंधीत अशा काही सीरिज आणि चित्रपट आहेत ज्यामध्ये स्पाय, दहशतवादी हल्ले आणि या सगळ्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे चित्ररण करण्यात आले आहे. इस्राइलशी संबंधीत या वेब सीरिज ओटीटीवर उपलब्ध आहेत. या पाहताना तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल...
वाचा: प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडायला नागराज मंजुळे पुन्हा सज्ज; चाहत्यांना दिली खास गुडन्यूज! पाहा व्हिडीओ...

१. म्यूनिख गेम्स

म्यूनिख गेम्समध्ये फिलिस्तीनी दहशतवादी संघटना ब्लॅक सप्टेंबर ग्रूपद्वारा ऑलंपिक शहरावर हल्ला केल्याची कथा दाखवण्यात आली आहे. या हल्ल्यात इस्राइलच्या ११ स्पर्धकांचा मृत्यू झाला होता. या चित्रपटात सेनेू सालेब, यूसेफ जो स्वीड आणि सेबेस्टियन रुडोल्फ दिसत आहेत. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

२. तेहरान

तेहरान ही इस्राइली टीव्हीवर येणारी स्पाय थ्रिलर सीरिज आहे. याची कथा जोंडर आणि ओमरी शेन्हारने लिहिली आहे. ही सीरिज २२ जून २०२० रोजी अॅप्ल टीव्हीवर प्रदर्शित झाली होती.

३. द स्पाय

द स्पाय हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात इस्राइलची गुप्तचर संस्था मोसादचे गुप्तहेर एली कोहेन यांची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहाता येणार आहे.

४.मोसूल

सध्या इस्राइलवर होणारे हल्ले आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर ओढावलेली परिस्थिती जवळून पाहण्यासाठी 'मोसूल' नक्की पाहा. ही कथा दहशतवादी हल्ल्यावर आधारित आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

५. वॅली ऑफ टीअर्स

इस्राइलमध्ये १९७३ साली योम किप्पुर युद्ध झाले होते. या युद्धावर आधारित ही सीरिज आहे. सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे ही सीरिज पाहाताना तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. या सीरिजमध्ये दोन मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइवर उपलब्ध आहे.

Whats_app_banner