मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nishi Singh: ‘इश्कबाज’ फेम निशी सिंह यांचे निधन

Nishi Singh: ‘इश्कबाज’ फेम निशी सिंह यांचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 19, 2022 09:20 AM IST

Nishi Singh Death: काही दिवसांपूर्वीच निशी याचा ५०वा वाढदिवस साजरा करण्यात आल्या. तेव्हा पतीने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली.

निशी सिंह
निशी सिंह (HT)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'इश्कबाज' आणि 'कुबूल है'मध्ये काम करणारी अभिनेत्री निशी सिंह यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ४८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

निशी यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्या चार वर्षांपासून आजारी होत्या. १३ फेब्रुवारी २०१९ रोजी तिला अर्धांगवायूचा पहिला झटका आला. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०२२ रोजी पुन्हा झटका आला. त्यानंतर २४ मे २०२२ रोजी पुन्हा तिसऱ्यांदा झाला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना सतत रुग्णालयात जावे लागत होते.

काही दिवसांपूर्वीच निशी याचा ५०वा वाढदिवस साजरा करण्यात आल्या. १६ सप्टेंबर रोजी त्या ५० वर्षांच्या झाल्या. निशी यांचे पती संजय सिंह यांनी तिची शेवटची इच्छा पूर्ण केली. निशी यांना घशाला संसर्ग झाल्यामुळे काही येत नव्हते. पण वाढदिवशी त्यांना बेसनची लाडू खाण्याची इच्छा झाली होती. ती इच्छा संजय यांनी पूर्ण केली.

कामाविषयी बोलायचे झाले तर निशी या ८ वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत होत्या. त्यांनी 'इश्कबाज' आणि 'कुबूल है' या मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर मान्सून वेडिंग या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. त्यांनी कमल हासन यांच्या मामूटी चित्रपटात काम केले. पण त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

IPL_Entry_Point

विभाग