Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना चढणार बोहल्यावर? Viral Videoने चर्चांना उधाण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना चढणार बोहल्यावर? Viral Videoने चर्चांना उधाण

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना चढणार बोहल्यावर? Viral Videoने चर्चांना उधाण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 23, 2023 03:25 PM IST

Vijay Deverakonda Rashmika Mandanna: सध्या सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन ते दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Vijay Deverakonda
Vijay Deverakonda

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाने यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. खऱ्या आयुष्यातही ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर रश्मिक आणि विजयचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे लंच डेटवर गेल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते सगळे रश्मिका आणि विजयच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी तर एकत्र आलेले नाहीत ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत रश्मिका किंवा विजयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वाचा: शादिसे पहिले नो टेस्ट ड्राईव्ह?, 'लस्ट स्टोरीज २' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

विजय आणि रश्मिकाचे 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' हे चित्रपट तुफान हिट ठरले. या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र त्यांनी अद्याप उघडपणे प्रेमाची कबुली दिलेली नाही.

रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत 'अॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विजय 'कुशी' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.

Whats_app_banner