Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

Rashmika Madanna: लिव्हइनमध्ये राहताता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 07, 2023 11:44 AM IST

Vijay Deverakonda-Rashmika Madanna: सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमुळे ते दोघे लिव्हइनमध्ये राहात असल्याचे म्हटले जात आहे.

Vijay Deverakonda and Rashmika Madanna
Vijay Deverakonda and Rashmika Madanna

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होता. त्यांनी अद्याप प्रेमाची कबूली दिलेली नाही. मात्र, दोघांच्या फोटोंवरुन ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. सध्या लोशल मीडियावर त्या दोघांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंवरुन ते दोघे लिव्हइनमध्ये राहात असल्याचे म्हटले जात आहे.

मंगळवारी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. हे फोटो तिचा असिस्टंट साई बाबूच्या लग्नसोहळ्यातील होते. पहिल्या फोटोमध्ये रश्मिकाने पिवळसर रंगाची साडी नेसून कपलसोबत दिसत आहे. त्यानंतर तिने घराच्या बाल्कनीमध्ये फोटो काढले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी विजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये देखील तो त्याच बाल्कनीमध्ये बसलेला दिसत आहे.
वाचा: प्रतिक्षा संपली! धैर्या, ढुंग्या आणि कबीरचा ‘बॉईज ४’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सोशल मीडियावर या दोघांचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत. या फोटोवरुन ते दोघे लिव्हइनमध्ये राहात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विजय आणि रश्मिकाचे 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' हे चित्रपट तुफान हिट ठरले. या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. मात्र त्यांनी अद्याप उघडपणे प्रेमाची कबुली दिलेली नाही.

रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत 'अॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, काही कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर विजयचा 'कुशी' हा चित्रपटात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसला आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नसल्याचे दिसत आहे.

Whats_app_banner