दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय सध्या चर्चेत आहे. या चर्चा त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे रंगल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय लग्नाच्या २३ वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा आणि मुलगी. मुलाचे नाव जेसन आहे तर मुलीचे नाव दिव्या. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विजय सध्या त्याचा आगामी चित्रपट वरिशूच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे त्याने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्याची पत्नी संगीता वेगळे राहात आहे. त्या दोघांनी मिळून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही किस करत राहिले अन्…; जाणून घ्या दीप-वीरची लव्हस्टोरी
विजयच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी त्याची पत्नी संगीता सहभागी होते. विजयसोबत सर्व ठिकाणी जाताना दिसते. पण आता ती कोणत्याही कार्यक्रमात विजयसोबत दिसली नाही. त्यामुळे ते दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एटलीची पत्नी प्रियाचे बेबी शॉवर होते. या कार्यक्रमात विजय दिसला नाही. शिवाय वरिसू चित्रपटाच्या संगीत लॉंच सोहळ्यात देखील संगीता दिसली नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दोघेही आजही एकत्र आहेत. संगीता मुलांसोबत यूएसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यामुळे ती संगीत लॉंच सोहळ्याला आली नाही. 'विजय आणि संगीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा आहेत. पण चर्चांना सुरुवात कशी झाली याची आम्हाला कल्पना नाही. या चर्चांना काही अर्थ नाही' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित बातम्या