दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री तमन्ना भाटियाची बॉलिवूडमधील लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. बाहुबली, जेलर आणि स्त्री-2 सारख्या चित्रपटांचा भाग असलेल्या तमन्ना भाटियाला तिचे चाहते नॅशनल क्रश म्हणून संबोधतात. अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तमन्ना भाटियाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. ती पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. तमन्ना भाटिया बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशीपमध्ये असून दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. २०२५ मध्ये हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. जाणून घ्या या बातम्यांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया...
तमन्ना भाटियाला विजय वर्मासोबतच्या लग्नाच्या बातमीबद्दल विचारणा करण्यात आली होती. तेव्हा तमन्ना म्हणाली की ती सध्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तमन्ना भाटीने नुकताच हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधला. त्यावेळी तिला लग्नाविषयी विचारण्यात आले. त्यावर तमन्नाने, "माझ्यासाठी लग्न आणि करिअरचा कोणताही संबंध नाही. मी खूप महत्वाकांक्षी मुलगी आहे. लग्नानंतरही मी अभिनय करत राहीन" असे उत्तर दिले.
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची पहिली भेट सुजॉय घोष दिग्दर्शित 'लस्ट स्टोरीज २' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. प्रेक्षक तिला आणि विजय वर्माला एका प्रोजेक्टमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहू शकतील का, असे विचारले असता ती म्हणाली, "का नाही, जर आम्हाला एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर विजय आणि मला ते करताना खूप आनंद होईल."
बॉलिवूडच्या या पॉवर कपलच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर २०२५मध्ये हे दोघेही लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. १२३ तेलुगूने आपल्या एका रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, या जोडप्याने लग्नाची सुरुवातीची तयारी पूर्ण केली आहे आणि सध्या ते मुंबईत एकत्र राहण्यासाठी घराच्या शोधात आहेत. लग्नानंतर ते याच घरात राहणार आहेत.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या दोघांनीही मुंबईत घर शोधण्यावर किंवा लग्नाच्या चर्चांवर अद्याप भाष्य केलेले नाही. तमन्ना भाटिया अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री-2 या चित्रपटात आयटम नंबर करताना दिसली होती. या चित्रपटात तिने शमा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. सिकंदर का मुकद्दर हा तिचा पुढचा चित्रपट असून यात अविनाश तिवारी आणि जिमी शेरगिल यांच्याही भूमिका आहेत.