'दबंग' फेम बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न गाठ बांधली होती. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा जल्लोषात पार पडला. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या सोनाक्षी सिन्हाने नुकतेच पती झहीर इक्बालसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षीच्या हातात तिचा पाळीव श्वान दिसत आहे. ज्या पद्धतीने हे फोटोशूट करण्यात आले आहे ते पाहून चाहते गोंधळात पडले आहेत. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत सोनाक्षी प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
सोनाक्षीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी लाल रंगाच्या सैल आऊटफिटमध्ये दिसत आहे. तसेच गळ्यात ऑक्सिडाईज ज्वेलरी, केसात गजरा असा सोनाक्षीचा सुंदर लूक आहे. तर जहीरने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. दोघांनी केलेले हे फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हाचा हेवी बेबी बंप दिसत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने सोनाक्षीला विचारले की, ती गरोदर आहे का? त्याचवेळी एका व्हेरिफाइड युजरने लिहिले, 'लवकरच येणाऱ्या छोट्या पाहुण्याचे अभिनंदन.' अभिनेत्रीच्या अकाऊंटशी संबंधित एका महिलेने तिच्या व्हेरिफाइड अकाऊंटवरून लिहिले, 'गरोदरपणाच्या शुभेच्छा.' एका यूजरने सोनाक्षीच्या फोटोवर कमेंट करत, 'हाय सैतान. तू खूप आनंद आणला आहेस' असे म्हटले आहे.
झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा खूप चुलबुले आहेत. ते सेलिब्रेशन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघेही अनेकदा इंटरनेटवर एकमेकांसोबत मस्ती करतानाचे फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी दोघेही एका दिवाळी पार्टीला गेले होते. या पार्टीमध्ये त्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता त्यांनी केलेल्या फोटोशूटमध्ये सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. स्वत: सोनाक्षीने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'फक्त या खोडसाळपणाचा अंदाज घ्या.'
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू
सोनाक्षी सिन्हाने अधिकृतरित्या ती गरोदर असल्याचे लिहिलेले नसले तरी चाहते तिच्या पोस्टवरुन ती प्रेग्नंट असल्याचा अनुमान लावत आहेत. सोनाक्षीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती 'काकुडा' या चित्रपटात काम करताना दिसली होती. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका होती आणि चाहत्यांना तिची ही भूमिका फार आवडली होती. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जी 5 वर रिलीज झाला होता. आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर सोनाक्षी निकिता रॉय आणि द बुक ऑफ डार्कनेस मध्ये दिसणार आहे.
संबंधित बातम्या