Sonakshi Sinha : लग्नाच्या एक महिन्यातच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओने वेधल नेटकऱ्याचे लक्ष
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonakshi Sinha : लग्नाच्या एक महिन्यातच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओने वेधल नेटकऱ्याचे लक्ष

Sonakshi Sinha : लग्नाच्या एक महिन्यातच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओने वेधल नेटकऱ्याचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jul 23, 2024 08:33 AM IST

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी एक महिनाभरापूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. त्यानंतर सोनाक्षीच्या हनिमूनच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी आणि जहीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काय आहे नेमका व्हिडीओ?

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल रविवारी एकत्र जेवायला बाहेर गेले होते. दोघं रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना पॅपराझींनी त्यांच्याशी बोलून त्या दोघांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यांचा तेथील व्हिडीओ सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये सोनाक्षी जहीरचा हात पकडून सावधपणे चालताना दिसत आहे. तर झहीर आपल्या पत्नीसाठी गाडीचा दरवाजा उघडताना दिसत आहे. जहीर ज्या प्रकारे सोनाक्षीची काळजी घेत आहे ते पाहून अनेकांना सोनाक्षी प्रेग्नंट असल्याचे वाटत आहे.

काय आहेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जहीरने निळ्या रंगाची जीन्स त्यावर डेनिम जॅकेट आणि टी-शर्ट घातला आहे. तर सोनाक्षी सिन्हा पोल्का ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. व्हिडिओवर कमेंट करत काही जण दोघांच्या केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत. काहीजण दोघांची जोडी परफेक्ट असल्याचं सांगत आहेत. तर काही जण सोनाक्षीला प्रश्न विचारत आहेत. एका युजरने लिहिले, 'सोनाक्षी गरोदर आहे का?' असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्या एका यूजरने "बेबी बंप दिसत आहे" असे म्हटले आहे.
वाचा: अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?

सोनाक्षीने नुकतेच ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जहीरविषय वक्तव्य केले होते. '"मी खूप आनंदी आहे कारण मला वाटते की मी असे काही केले ज्याची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता मी जिथे असायला हवे होते तिथे पोहोचले आहे. मला जहीरसोबत वेळ घालवायला खूप आवडत आहे. त्यासाठी मी काही काळ घरीच आहे. यापूर्वी मी काम संपवून कधी जहीरला भेटते असे मला वाटायचे. माझी खूप आधीपासून इच्छा होती की आम्ही एकत्र यावे, पण एकत्र यायला फार वेळ लागला'' असे सोनाक्षी म्हणाली.

सोनाक्षीच्या कामाविषयी

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला केवळ दोन आठवड्यात ‘काकुदा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरुवात केली. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता सोनाक्षी लवकरच ‘हिरामंडी २’ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

 

 

Whats_app_banner