Anant Ambani Pre-wedding: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट-is shah rukh khan insulted at anant ambanis wedding viral video sparks outrage among fans watch ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anant Ambani Pre-wedding: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

Anant Ambani Pre-wedding: अनंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 04, 2024 06:23 PM IST

Shah Rukh Khan Viral video: सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानीच्या प्रीवेडिंग फंकशनमधील एक व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खानचा अपमान झाल्याचे म्हटले जात आहे.

Shah Rukh Khan Video
Shah Rukh Khan Video

Shah Rukh Khan Video from Anant Wedding: जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय विवाहपूर्व सोहळ्याची सोमवारी सांगता झाली. या प्रीवेडिंग फंकशनला जगभरातील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांनी हजेरी लावली. जामनगरमध्ये पार पडलेल्या या फंकशनची जोरदार चर्चा सुरु आहेत. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुखचा अपमान झाल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. चला जाणून घेऊया नेमके काय झाले..

काय आहे व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रामातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अनंतचा मोठा भाऊ आकाश हा पंजाबी ढोलच्या तालावर नातच असतो. तेथे अभिनेता रणबीर कपूर आणि शाहरुख खान उभे असतात. ते दोघेही नाचत असता. दरम्यान, आकाश अंबानी देखील तेथे नाचत असतो. काही वेळाने आकाश त्याच्या आईला नीता अंबानी यांना घेऊन वरातीच्या मध्यभागी उभा राहतो आणि नाचायला सुरुवात करतो. आरके आणि एसआरके हातात हात धरुन नातच असतात. तेवढ्यात आकाश त्या दोघांना बाजूला होण्यास सांगतो. जेणे करुन इतर पाहुण्यांना देखील नाचता येईल. तेवढ्यात एक व्यक्ती शाहरुखच्या दिशेने चालत येते आणि त्याला एक पेय पिण्यासाठी देते.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ

काय आहे सत्य?

सोशल मीडियावर शाहरुखचा हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी आकाशच्या वागणुकीचा निषेध वर्तवला आहे. पण चाहत्यांचा नक्कीच गैरसमज झाला असावा. कारण व्हिडीओमध्ये जी परिस्थिती दिसते तशी नाही. अंबानी त्यांच्या मित्र आणि पाहुण्यांना मैत्रीपूर्ण वागणूक देतात. ते कधीही कोणाला चुकीची वागणूक देत नाहीत. त्यामुळे या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

अनंत अंबानीचे कधी होणार लग्न?

गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
वाचा: अचानक तब्बूने फोन केला अन्...; मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितली गोड आठवण

Whats_app_banner