
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता समांथाला दुसरे लग्न करण्याबाबत विचारण्यात आले आहे. त्यावर समांथाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
समांथाने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला आहे. ती वेगवेगळ्या देशात फिरताना दिसत आहे. तेथील फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. तसेच काही कार्यक्रमांना देखील ती हजेरी लावताना दिसते. दरम्यान, समांथाला दुसऱ्या लग्नाबाबत विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेले उत्तर चर्चेत आहे.
वाचा: अशोक सराफ सोशल मीडियावर का नाहीत? स्वत: सांगितले कारण
रविवारी समांथाने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या फिचरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी चाहत्यांनी देखील समांथाला अनेक प्रश्न विचारले. एका यूजरने तिला ‘तू पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहेस का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर समांथाने “आकडेवारी पाहता ही एक वाईट गुंतवणूक आहे” असे उत्तर दिले आहे. त्यासोबतच समांथाने घटस्फोटाची आकडेवारी शेअर केली आहे. या आकडेवारीमध्ये पहिल्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण ५० टक्के, दुसऱ्या लग्नात ६७ टक्के आणि तिसऱ्या लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण ७३ टक्के असल्याचे लिहिले आहे.
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
