दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यापाठोपाठ आता समांथा देखील एका दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
रेडिटवरील वृत्तानुसार, समांथा ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती दिग्दर्शक राज निदिमोरुला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहे. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत. राज आणि समांथाने 'द फॅमिली मॅन २' या सीरिजसाठी एकत्र काम केले. याच सीरिजच्या माध्यमातून तिने ओटीटी विश्वात पदार्पण केले. आता राज आणि समांथाच्या डेटिंगच्या चर्चा सुरु आहेत. मात्र दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
समांथा आणि राजची 'द फॅमिली मॅन २' ही वेब सीरिज विशेष पसंतली उतरली होती. या सीरिजमध्ये समांथा पहिल्यांदा अॅक्शन करताना दिसली. तिची ही सीरिज भलतीच गाजली. या सीरिजमध्ये समांथाने एक इंटिमेट सीनदेखील दिला होता. या सीनची जोरदार चर्चा रंगली होती. या सीरिजच्या शुटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आता ते एकमेंकांना डेट करत आहेत असे देखील म्हटले जात आहे. समांथा प्रेमाची कबूली देणार का? किंवा राज यावर काही मत मांडणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. येत्या काळात याविषयी उलघडा नक्की होईल.
वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्यानंतर सामंथा रुथ प्रभूने केली पहिली पोस्ट
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
संबंधित बातम्या