मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. केवळ मराठीच नाही तर तिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. सई तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सई निर्माता अनिश जोगला डेट करत होती. ती बॉयफ्रेंडसोबत फिरताना, एकत्र सण-वाढदिवस साजरा करताना दिसते. पण आता त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे.
सईने काही वर्षांपूर्वी निर्माता अमिक गोसावीसोबत लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी घटस्फोट घेत सर्वांना चकीत केले. त्यानंतर सई बराच काळ सिंगल होकी. त्यानंतर तिने निर्माता अनिश जोगला डेट करण्यास सुरुवात केली. दोघेही एकत्र फिरताना दिसत होते. पण आता त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामुळे आता सई आणि अनिशचंही नात संपलं असल्याचं म्हटलं जातंय. सईने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी स्वत:च्या चॉईसने सिंगल आहे. ही माझी निवड नाही पण आता ही माझी निवड आहे. त्यावर तिने #Truestroy असंही म्हटलं आहे. त्यामुळे सई ताम्हणकर आता सिंगल असल्याचं तिच्या या पोस्टवरुन म्हटलं जातंय. इकतच नव्हे तर सईने अनिशसोबतचे तिचे फोटोही तिच्या सोशल मीडियावरुन काढून टाकले आहेत.
या गोजिरवाण्या घरात मालिकेत काम करुन अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले. सईच्या बोल्डनेसमुळे तिला अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले, पण सईने याचा परिणाम स्वत: वर होऊ दिला नाही आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. सई सध्या कोट्यवधींची मालकीण आहे. तसेच ती बॉलिवूडमध्ये देखील स्वत:चे स्थान निर्माण करताना दिसत आहे. ती काही हीट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे.
वाचा: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार
अनिश हा एक अतिशय लोकप्रिय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. सई आणि अनिशने आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटांमध्ये ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता भविष्यात देखील त्यांचे सिनेमे येणार असल्याचे म्हटले जात आहे. अनिश आणि सईची पहिली भेट चित्रपटांच्या निमित्ताने झाल्याचे म्हटले जाते. त्यांची भेट सेटवर झाली की इतर ठिकाणी याबाबत माहिती समोर आलेली नाही.