मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prajakta Mali : राजकारणात प्रवेश करणार का?; प्राजक्ता माळी म्हणाली…

Prajakta Mali : राजकारणात प्रवेश करणार का?; प्राजक्ता माळी म्हणाली…

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 05, 2024 12:34 PM IST

Prajakta Mali Entry In Politics: गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली होती. आता त्यावर प्राजक्ताने प्रतिक्रिया देत पूर्णविराम लावला आहे.

Prajakta Mali
Prajakta Mali

आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आता अनेक क्षेत्रांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या प्राजक्ता माळीने काही महिन्यांपूर्वी आपला कविता संग्रह प्रकाशित केला होता. तर, त्यानंतर तिने 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू करत व्यवसाय क्षेत्रात देखील पदार्पण केले होते.लवकरच प्राजक्ता माळी राजकारणात प्रवेश करणार अशी कुजबुज सुरू झाली आहे. प्राजक्ताचे चाहते देखील यावर चर्चा करत आहे. आता या सगळ्यावर प्राजक्ताने प्रतिक्रिया दिली आहे.

प्राजक्ताने ऑक्टोबर महिन्यात नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला प्राजक्ताने हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर प्राजक्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची भेटही घेतली होती. त्यांच्या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो व्हायरल होताच अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. आता प्राजक्ताला एका मुलाखतीमध्ये हे प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
वाचा: आमिरने भरमांडवात किरण रावला केले किस, अशी होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

प्राजक्ता म्हणाली, "राजकारणात जायचा माझा काहीही विचार नाहीये, पण मला असे वाटते की, थोरा-मोठ्यांच्या भेटी घ्याव्यात. मी त्यांच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यामुळे त्यांची भेट घेतली. भविष्यात मला जे करायचं आहे त्यासाठी कधीतरी मला या ओळखी कामी येऊ शकतात, या उद्देशानेही मी या राजकीय नेत्यांना भेटले."

WhatsApp channel