गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परिणितीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंवरुन ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नुकत्याच एका कार्यक्रमाला परिणितीने हजेरी लावली. त्यावेळी तिने घातलेल्या ड्रेसमुळे प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आले. या चर्चांवर परिणितीने उत्तर दिले आहे.
नुकताच परिणितीने नेटफ्लिक्स चित्रपट चमकिलाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने काळ्या रंगाचा कफ्तान ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमुळे परिणिती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले. या चर्चा पाहून परिणितीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: भर कार्यक्रमात अक्षय कुमारने दिला अभिनेत्रीच्या ड्रेसवर पाय अन्...; पाहा नेमकं काय झालं
परिणितीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हसण्याचा इमोजी वापरत, 'कफ्तान ड्रेस= प्रेग्नंसी, ओवरसाइज शर्ट= प्रेग्नंसी, भारतीय कुर्ता= प्रेग्नंसी' असे लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी परिणितीने ओवर साईज शर्ट परिधान केला होता. बेबी बंप लपवण्यासाठी तिने हा शर्ट घातल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे यावेळी परिणितीने अशी पोस्ट केली आहे.
वाचा: १२-१३ तास सलग रडतेय; आशुतोषसाठी अरुंधतीची भावनिक पोस्ट
दरम्यान, परिणिती चोप्राच्या जवळच्या सुत्रांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रेग्नंसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. 'प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. ती गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त आणि खासगी कामानिमित्त इकडून तिकडे प्रवास करत आहे. खरं तर, एखाद्याच्या पोशाखाच्या निवडीमुळे या चर्चा सुरु होतात आणि त्यामुळे खासगी आयुष्यात घुसखोरी होऊ शकते हे धक्कादायक आहे' अशी माहिती सुत्रांनी दिली.
पुढे त्यांनी सांगितले की, "परिणितीला तिचे आयुष्य हे खासगी ठेवायला आवडते. ती काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की प्रेग्नंट आहे. तिने तिच्या कामाचे योग्य नियोजन केले आहे आणि त्यानुसार ती वागत आहे."
वाचा: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने गुपचूप केले लग्न?
परिणितीने आपचे खासदार राघव चड्ढा यांच्याीशी लग्न केले आहे. त्यांनी उदयपुरमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा २४ सप्टेंबर रोजी पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते.
संबंधित बातम्या