
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता नागा चैतन्य पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. आता नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन त्या दोघांमधील भांडण मिटले असून ते पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नागा चैतन्यने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोचो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याचा पाळीव श्वान असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने ‘vibe’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवरुन समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र आल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांचा पॅचअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
वाचा: शाहरुख खानच्या जीवाला धोका; बॉलिवूड किंगच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ!
सध्या समांथा ही इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने सोशल मीडियावर या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. समांथा इटलीला गेल्यामुळे नागा चैतन्य तिच्या पाळीव श्वानाची काळजी घेत आहे.
एका यूजरने नागा चैतन्याच्या या पोस्टवर कमेंट करत “मित्रांनो पॅच अप करा. हॅशसाठी करा” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “प्लीज तुम्ही दोघे पॅच अप करा, आम्हाला तुम्ही दोघे एकत्र खूप आवडता. जेव्हा तुम्ही पॅच अप कराल, तेव्हा आम्ही याचा आनंद साजरा करू” असे म्हटले आहे. चाहत्यांना नागा चैतन्य आणि समांथाला एकत्र पाहण्याची इच्छा आहे.
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
