
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कपल अभिनेत्री समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर नागा चैतन्यने समांथाच्या पाळीव श्वानासोबत फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन त्यांचा पॅचअप झाला की काय असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता समांथाने या चर्चांवर प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे.
समांथाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या लूकमध्ये समांथा अतिशय हॉट दिसत आहे. फोटोंमधील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे समांथाच्या कंबरेवर असलेल्या टॅट्यूने. समांथाने तिच्या कंबरेवर नागा चैतन्यशी संबंधीत एक टॅट्यू काढला होता. आता पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये समांथाच्या कंबरेवर ते फोटो दिसत नाहीत. एप्रिल महिन्यात समांथाने हे टॅट्यू काढून टाकले. त्यामुळे सोशल मीडियावर सुरु असलेल्या पॅचअपच्या अफवा आहेत.
वाचा: “जेव्हा इस्राइलने पॅलेस्टाईनवर...", स्वरा भास्करने केली पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पोस्ट
नागा चैतन्यने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याचा पाळीव श्वान असल्याचे दिसत होता. फोटो शेअर करत त्याने ‘vibe’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवरुन समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र आल्याचे म्हटले जात होते. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघांची भेट २०१०मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि हळहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांनी एकमेकांना डेट केले आणि तब्बल ७ वर्षांनी २०१७मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. गोव्यात मोठ्या थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. मात्र, लग्नाच्या अवघ्या ४ वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
