Sayali Sanjeev Video: आज १९ ऑगस्ट रोजी सगळीकडे रक्षाबंधन हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि प्रगतीसाठी ती श्री हरीकडे प्रार्थना करते. रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. त्यानिमित्ताने अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, अभिनेत्री सायली संजीवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा भाऊ लग्नाविषयी बोलताना दिसत आहे.
अभिनेत्री सायली संजीवने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भावासोबत संवाद साधताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला बहिण भावांची होणारी भांडणे दाखवण्यात आली आहेत. पण वेळ आल्यावर बहिणच भावाच्या उपयोगी येते हे देखील दिसत आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी सायलीचा भाऊ भावनिक होताना दिसतो. तो तिला म्हणतो, 'मला पुढच्या वर्षी राखी बांधून घेण्यासाठी ४० किलोमीटर लांब यावे लागणार आहे. तुझं लग्न ठरलय ना.' ते ऐकून सायली देखील भावूक होते.
सायलीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सायलीसोबत दिसणारा मुलगा हा तिचा भाऊ नसून इन्फ्लूएंसर आर्यन पाटकर आहे. त्यांनी रक्षाबंधनसाठी हा खास व्हिडीओ शूट केला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर केले आहेत. आता सायलीचे खरच लग्न ठरले आहे की हे फक्त व्हिडीओ पुरता आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण चाहत्यांमध्ये मात्र चर्चेला विषय मिळाला आहे. नेटकऱ्यांनी तर सायलीच्या या व्हिडीओवर मजेशीर कमेंट केलेल्या आहेत.
वाचा: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार
सायली संजीवने एका जाहिरातीमध्ये काम करत इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने काहे दिया परदेस या मालिकेत काम केले. या पहिल्याच मालिकेने सायलीने प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतून ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. त्यानंतर सायलीने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले. सायलीच्या आगामी प्रोजेक्टची सर्वजण वाट पाहात आहेत.