Malaika Arora Rahul Vijay Relationship : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत मलायका अरोराचे ब्रेकअप झाल्यापासून तिचा एखाद्या पुरुषासोबतचा फोटो समोर आला, तर लोक तिचे नाव त्या व्यक्तीशी जोडू लागतात. नुकताच मलायकाचा स्टायलिस्ट राहुल विजयसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी दोघांची नावे एकमेकांसोबत जोडायला सुरुवात केली होती. पण, आता या नात्यामागचं सत्य समोर आले आहे.
एचटी सिटीच्या रिपोर्टनुसार, मलायकाच्या आयुष्यात सध्या कोणीही नाही. एचटी सिटीशी बोलताना मलायकाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, ‘कृपया तुम्ही वस्तुस्थिती तपासा. ती तिच्या आयुष्यात एकटी आणि आनंदी आहे. राहुल विजय हा तिचा मुलगा अरहानचा स्टायलिस्ट आणि त्याचा मित्रही आहे. हेच या नात्याचे सत्य आहे. बाकी दोघांच्या नात्याची ही अफवा बकवास आहे.’
विजयने इन्स्टाग्राम स्टोरीवर एपी ढिल्लनच्या मुंबई कॉन्सर्टमधील मलायकासोबतचा फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना त्याने लिहिलं, "थांबा... ही मलायकाची कॉन्सर्ट आहे का?' या दोघांचे सेल्फीही व्हायरल होत होते. बरं, जे चाहते या दोघांमध्ये रोमँटिक कनेक्शन आहे असं मानत होते, त्यांना असं काहीच नाही असं सांगण्यासाठी मलायकाच्या जवळच्या व्यक्तीने पुढाकार घेतला.
मलायका अरोराचे नाव यापूर्वी अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले आहे, परंतु तिने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य अगदी खाजगी ठेवले आहे. तिने क्वचितच मीडियामध्ये तिच्या आयुष्याबद्दल कोणतेही विधान केले आणि यावेळीही तिने या अफवांवर गप्प बसण्याऐवजी तिच्या जवळच्या स्रोताद्वारे थेट परिस्थिती स्पष्ट केली.
राहुल विजयबद्दल बोलायचे झाले तर, तो मलायकाचा मुलगा अरहानचा स्टायलिस्ट आहे आणि दोघांमध्ये व्यावसायिक नात्याशिवाय दुसरे कोणतेही नाते नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या नात्याची ही गोष्ट केवळ एक अफवा असल्याचे समोर आले आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं आहे. बऱ्याच दिवसांपासून ही बातमी चर्चेत येत होती. पण ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान स्वत: अर्जुन कपूरने स्वत:ला सिंगल सांगितल्यावर यावर शिक्कामोर्तब झाला. एका कार्यक्रमात अर्जुनला पाहून कुणीतरी मलायकाच्या नावाने आरडाओरडा केला होता. यावर अर्जुन म्हणाला, ‘नाही, आता मी सिंगल आहे, रिलॅक्स व्हा.’
मात्र, मलायका अरोरा अद्याप ब्रेकअपवर उघडपणे बोललेले नाही. या प्रकरणी ती अजूनही गप्प आहे. मात्र, ती सोशल मीडियावर सतत अशा पोस्ट शेअर करत असते, ज्यातून ती मनातील भावना व्यक्त करत असते.
संबंधित बातम्या