बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने वडील अरबाज खानच्या लग्नात गिटार वाजवून, गाणे गाऊन सर्वांचे लक्ष वेधले. आता सोशल मीडियावर अरहानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री रवीन टंडनची मुलगी राशा थडानीसोबत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अरहानने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि फिकट रंगाची पँट घातली आहे. तसेच डोक्यावर टोपी घातली आहे. तर दुसरीकडे राशाने काळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोघेही कॅमेरापासून पळत आहेत. त्यामुळे ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: आईच्या आठवणीत तेजश्री प्रधान झाली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
मजेशीर गोष्ट म्हणजे अरबाज खानच्या लग्नाला काही मोजक्याच कलाकारांना बोलवण्यात आले होते. त्यामध्ये रवीना टंडन आणि तिची मुलगी राशाला खास आमंत्रण देण्यात आले होते. कारण अरबाजची पत्नी शूरा आणि रवीना यांच्यामध्ये एकदम जवळचे नाते आहे. सर्वात आधी रवीनानेच या लग्नाबाबत कन्फर्मेशन दिले होते. शूरा आणि अरबाजच्या लग्नाच्या एक दिवसआधी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रवीनाने त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
राशाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच अभिषेक कपूरच्या अनटायटल्ड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण देखील दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.